Maharashtra Politics : "तुम्ही सोडले, वाईट जरूर वाटले, पण सचिन आहीर यांचा राजकीय प्रवास कलंकित !" संजय राऊतांची अहिरांवर सडकून टीका - टॉप न्यूज मराठी

मुंबई : सध्या उद्धव ठाकरेंच्या Udhhav Thackeray  शिवसेनेमध्ये Shivsena आउटगोइंगला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. नऊ पैकी सहा खासदार गेल्यानंतर आता आमदार देखील साथ सोडत आहेत. यामध्ये सर्वात पहिला नंबर लागला तो सचिन अहिर यांचा परंतु ठाकरे कुटुंबीयांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे सचिन आहेर यांनी असा विश्वासघात केल्याने पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी एकीकडे खेद व्यक्त केला. तर अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित अशी टीका देखील केली आहे. 

काय म्हणाले संजय राऊत Sanjay Raut

सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचे निश्चित केल्यानंतर त्यांना आता विधान परिषदेचे सभागृहाचे उपसभापती पद देण्यात येणार आहे. दरम्यान आहिरांच्या या सोडचिठ्ठी नंतर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या फटकळ शैलीमध्ये सचिन आहिर यांच्यावर टीका केली आहे ते म्हणाले की, "शरद पवार यांना बेसावध ठेवून सचिन अहिर हे शिवसेनेत दाखल झाले होते. पुढील करिअरसाठी अहिरांनी शरद पवार यांना देखील सोडलं होतं. सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्यांना भरभरून दिले. उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत अशी सबब ते सांगू शकत नाहीत,  सचिन आहे हे सांगू शकत नाही की मला कोणी भेटत नव्हतं माझं कोणी ऐकत नव्हतं आदित्य ठाकरे आणि सचिन रोजच भेटत होते. 

आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज 

संजय राऊत म्हणाले कि, " पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि बाकी सगळे जातात. सुनील शिंदे, आदित्य ठाकरे दोन वेळा आमदार झाले. या काळामध्ये त्यांच्या राजकीय भविष्य घडवण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी केले. त्यांना भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष केलं. आता पुणे जिल्हा त्याच्या ताब्यात दिला. अजून एखाद्याला काय द्यायला पाहिजे? माणसाला समाधानी राहणं हे फार मोठा संस्कार आणि कला अजून काय मिळावं की त्याला समाधान मिळेल इतक्या मिळाल्यावर सुद्धा त्यांना वाटत असेल की माझ करिअर झाले नाही आणि त्यासाठी मी तुमच्यावरती आम्ही सगळ्यांनीच प्रेम केलं ठाकरे कुटुंबाने केलं शिवसेनेने केलं त्यांना अंधारात ठेवून झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेला ? हे इमान मानत नाही. कोणाकडे गेले अजून काय देणार? अजून कुठेतरी उमेदवारी देणार. पण तुमचा जो राजकीय प्रवास आहे त्या राजकीय प्रवासामध्ये जागोजागी खड्डे दिसतात. तुम्ही सोडले, वाईट जरूर वाटले. पण त्यांनी असं करायला नको होतं. त्यांना सर्व काही मिळाले. सर्व काही दिलं. मान सन्मान प्रतिष्ठा पदासाठी गेले ते शोध हे सर्व दिल्याबद्दल एखादा माणूस जात असेल आणि त्याला फोडल्याबद्दल एकनाथ शिंदे विकट हास्य करतात. रावणाप्रमाणे हसतात, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.