MAHARASHTRA POLITICS : उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदार संघ दौऱ्यावर; "अनेकांनी सांगितलं होतं की मैदान चुकले...!" नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे, वाचा सविस्तर - टॉप न्यूज मराठी

नागपूर : 18 जून रोजी उद्धव ठाकरेंच्या  Udhhav Thackeray शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. नऊ पैकी सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंना Eknath Shinde आपलंसं केलं. यानंतर आता 14 आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर असल्याचं बोललं जात असतानाच फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांनी कूच केल आहे.

आज उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आहेत. यावेळी विमानतळावर पोहोचल्यावर त्यांनी समर्थकांना म्हणाले की, " शिवसेना हे प्रकरण काय आहे हे विरोधकांना कळलेलं नाही त्यांच्या कळण्याच्या पलीकडील आहे. दोन चार गद्दार फोडले तर शिवसेना संपून जाईल असं त्यांना वाटतं. पण असे अनेक गद्दार आमच्यातून निघून गेले तरी जोपर्यंत तुमच्यासारखे कट्टर ,कडवट निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत तोपर्यंत शिवसेना कोणाच्या कितीही पिढी उरल्या तरी संपणार नाही आणि संपवू शकत नाही. आज मी यवतमाळला चाललो आहे पण आज तुम्हाला शब्द देतो की पुढे मी नागपुरात आल्याशिवाय राहणार नाही. नागपुरात आल्यावर एक शिवसैनिकांचा मेळावा घेऊ आपण काही वर्षांपूर्वी कस्तुरचंद पार्कमध्ये सभा घेतली होती. तेव्हा तिथली गर्दी ओसंडून वाहत होती. अनेकांनी आम्हाला सांगितलं होतं की मैदान चुकलंय मात्र आम्ही जिथे उभा राहतो ते मैदान ओसंडून वाहत...!" असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.  

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील एकंदरीत उलथापालथ पाहता त्यांनी आता फुटीरांच्या मतदारसंघात दौरा करण्याचे ठरवले आहे. यासाठी आज नागपूर आणि त्यानंतर यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, शिर्डी या मतदारसंघांमध्ये स्वतः जाऊन उद्धव ठाकरे कट्टर शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.