MAHARASHTRA POLITICS : ऑपरेशन टायगर पासून सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीस यांनीच सावध राहिलं पाहिजे...! नेमकं काय म्हणाले संजय राऊत, वाचा सविस्तर - टॉप न्यूज मराठी

मुंबई : महाराष्ट्रात सध्या पुन्हा एकदा राजकारणात फोडाफोडीच पेव फुटले आहे. सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाकडे मोर्चा वळवला आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. दरम्यान 'शिंदेंच्या ऑपरेशन टायगर पासून सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीस यांनीच सावध राहिले पाहिजे' अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत 

महाराष्ट्रातील एकंदरीत फोडाफोडीचा वातावरण पाहता उद्धव ठाकरेंची धडाढणारी तोफ संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येऊन थेट नाव घेत शिंदेंवर अनेक आरोप केले आहेत. तर थेट भाजपच्या दिग्गज नेत्यांवर देखील गंभीर टिप्पणी केल्या आहेत. संजय राऊत हे माध्यमांशी बोलत असताना सहा खासदार फुटल्यानंतर आता आमदार देखील शिंदे फोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "कदाचित त्यांना आता पुढे काहीच काम राहणार नाही. सगळेच फोडणार आहेत ते एक दिवस ते देवेंद्र फडणवीस यांनाही फोडतील, मग उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळे यांना फोडणार आहे. मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले आहेत. एकदा माणसाला नशा चढली भांग, गांजा फोडाफोडीची की मग ते काहीही बोलू शकतात. शेवटी ते सांगतील आता मी अमित शहा यांनाही फोडले. त्यामुळे ऑपरेशन टायगर पासून सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीस यांनीच सावध राहिलं पाहिजे...!" अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या टीकेला प्रतिउत्तर 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या बोलण्यामुळेच आमचा पक्ष वाढतोय असा खोचक टोला त्यांना लावला होता. यावर पत्रकारांनी सवाल केले असता संजय राऊत म्हणाले की, " वाढू द्या ना पक्ष, तुमचा पक्ष कसा वाढतो पक्ष वाढण्यासाठी परवा सहा खासदारांना 50-50 कोटी रुपये दिले. किती खर्च आहे तुम्हाला माझ्यामुळे... मी बोलल्यामुळे तुमचा खर्च किती वाढतोय 50 कोटी दिले परत 25-25 कोटी द्यायचे. त्याच्या आधी माझ्यामुळे हजार दोन हजार कोटी दिले. माझ्यामुळे तुमचा खिसा फाटतोय असे प्रत्युत्तर यावर संजय राऊत यांनी यावेळी दिले.