पुणे : पुणे जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी एक महत्त्वाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 19 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार विकसित केलेल्या महा उपलब्धी या अधिकृत मोबाईल अॅपबाबत सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण देखील यावेळी केले जाणार आहे.
हा मेळावा शुक्रवार दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3.30 ते 5.30 या वेळेत होणार आहे. शरदचंद्रजी पवार सभागृह, पहिला मजला, नवीन जिल्हा परिषद, पुणे येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा कोषागार कार्यालयाकडून आवाहन करण्यात आले आहे की जिल्हा कोषागार कार्यालय, पुणे मार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
महाराष्ट्र शासनाने निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा मिळाव्यात यासाठी महा उपलब्धी हे अॅप तयार केले आहे. यातून निवृत्तीवेतन स्लिप, जीवन प्रमाणपत्र, तक्रार निवारण अशा सुविधा मोबाईलवर मिळणार आहेत.