पॅलेस आणि खासगी विमानांची बुकिंग झाल्यानंतर काहीच दिवसांत बिझनेसमनच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला; तपासात जवळच्या व्यक्तीची भूमिका समोर आली.
लोणावळा जवळ असलेल्या लोहगड किल्ल्यावरुन दरीत कोसळून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणात नाट्यमय घडामोड समोर आली आहे. पुण्याच्या लोहगडावरून फोटो काढताना केतन अग्रवाल या प्रसिद्ध बिझनेसमनच्या तरुण मुलाचा दरीत कोसळून मृत्यू झालाा होता. या धक्कादायक घटनेने होणाऱ्या नात्यावर काळी छाया पडली असून तपास अधिकारीही चक्रावून गेले आहेत. कोणी इतका निर्दयी कसं असू शकतं असा प्रश्न या घटनेनंतर विचारला जात आहे. जवळच्या व्यक्तीने केतनचा काटा काढल्याचे तपासात समोर आले आहे.
घटनेला नाट्यमय वळण
होणाऱ्या पत्नीसोबत सुखी आयुष्याची स्वप्न केतनने रंगवली होती. तिच्यासोबत पुढील प्लॅनिंग त्यानं आखलं होते. गुरुवारी केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता. वाढदिवसा निमित्ताने केतन आणि होणारी पत्नी लोहगडवर ट्रेकिंगला गेले होते. त्यावेळी फोटोसाठी पोज देताना तो घसरून पडला, असं समोर आलं होतं. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात एक वेगळाच खुलासा झाला आहे. हा एक बनावट प्रसंग असल्याचं उघड झालं आहे. होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराने केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलं आहे. होणाऱ्या पत्नीचा ही घटनेत समावेश आहे का? याची चौकशी सुरू झाली आहे. सोबत यामध्ये अजून कोणी कोणी साथ दिली याची चौकशी सुरू आहे.
असा लागला शोध
गुरुवारी भावी पत्नीसोबत केतन लोहगडवर ट्रेकिंगसाठी गेला होता. ट्रेकिंग आणि फोटोशूट सुरू असताना केतन दरीत कोसळल्याची माहिती पत्नीने दिली. बचाव पथकाने तीन तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवून मृतदेह शोदून काढला. या घटनेनंतर पोलिसांने तपासाची दिशा फिरवली. मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड, घटनास्थळावरील काही व्यक्तींची चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या मनात पाल चुकचुकली. त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले.
शाहीविवाहची तयारी
केतन अग्रवाल हा पिंपरी-चिंचवडमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. तो नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार होता. राजस्थानमधील उदयपूर येथे शाही विवाह सोहळा होणार होता. त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. 17 कोटीचा पॅलेस बूक करण्यात आला, विमान बूक करण्यात आले होते. या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण या घटनेने दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #murdercase #ketanagrawal