लातूर : औसा - तालुक्यातील येल्लोरी येथे सुरू असलेल्या बनावट मद्य निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी लातूर भारत बारसटे, सह आयुक्त अमलबनवाणी आणि दक्षता प्रसाद सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विभागीय उपायुक्त डी.ओ.एच.तडवी, अधीक्षक युवराज गोसावी आणि अधिक्षक युवराज गोसावी राठोड यांच्या आदेशाने लातूर पथकाने येल्लोरी शिवरातील आरोपीच्या इसमाच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला.
छाप्यात बनावट मद्य निर्मितीसाठी वापरण्यात येणारे 2500 लिटर स्पिरिट, बॉटलिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन, लेबल, फ्लेवरिंग एजंट, 180 मिली क्षमतेचे रिकामे काचेचे बाटल्या आणि बनावट मद्य निर्मितीसाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण 5,23,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या गुन्ह्यात 1) नागराज उत्तरेश्वर रिंगणकर 2) आदित्य जगन्नाथ बेंडगे दोघे रा. येल्लोरी, ता. औसा, जि. लातूर या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तपासात निष्पन्न झालेले इतर आरोपी फरार आहेत.
या कारवाईत अधीक्षक युवराज गोषीगाव राठोड, उप अधीक्षक एम.जी.मुपडे, निरीक्षक आर.एस.कोनतावळ, व्ही.व्ही.मिसाळ, पी.दांते, दुद्यम निरीक्षक बी.आर.वायमोडे, जी.व्ही.साळवे, एस.पी.काळे, एस.डी.बुले, डी.डी.साळवी, आर.एम.माकोडे, एस.राठोड, एस.वाघमारे, बी.आशामोड, व्ही.एस.पवार, एस.डी.निरीक्षक निलेश गुणाले, मंगेश खारकर, राजानन होळकर, एस.केंगारे, जवान सौरभ पाटदवकर, ज्योतिराम पवार, श्रीकांत साळुंके, संतोष कंडे, दिनेश गोमारे, गीता शेंनवाड, प्रथमेश फतपुरे, विशाल सुदके, समाधान गिरी, बळीराम साखरे, ऋषिकेश चिंचोलीकर, भरत गायकवाड, शैलेश गडूमे, हणमंत माने, मीरा हासुळे, शीतल पवार, कपिल गोसावी यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास श्रीमती डी.डी.साळवी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क निलंगा-3 हे करत आहेत.
अवैध मद्यविक्री आणि अवैध धंदे व वाहतुकी विरुद्ध कारवाई यापुढेही चालू राहणार असून नागरिकांनी अवैध बनावट मद्या बाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 18002339999 अथवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर किंवा कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे अधीक्षक युवराज राठोड यांनी सांगून अवैध मद्य बाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.