Latur: शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी दिवाळीचा शिधा वाटप; २५०० दिवाळी शिधा किटचे वाटप - टॉप न्यूज मराठी

लातूर : लातुरच्या अहमदपूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना आनंदाने दिवाळी सण साजरा करता यावा म्हणून महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गटाचे नेते व माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी दुष्काळग्रस्तसाठी दिवाळीचा शिधा वाटप केला आहे.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून "मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण..! मदतीचा हात एकनाथ " हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सामान्य गरजू गोरगरीब नागरिकांना शिवसेने कडून मदतीचा हात म्हणून हा दिवाळीचा शिधा वाटप करण्यात आल्याचे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी सांगितले.

हा कार्यक्रम विनायकराव पाटील संपर्क कार्यालय एमआयडीसी अहमदपूर येथे दिनांक १ नोव्हेंबर रोजी घेण्यात आला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर २५०० दिवाळी शिधा किटचे वाटप महिला पुरुषांनी लाभ घेतला..