मुंबई : लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक बहिणींनी योजनेचा लाभ घेतला आहे. पण या योजनेसाठी काही नियम देखील होते. परंतु असे नियम अनेक बहिणींनी धाब्यावर बसवले आहेत. अशा बहिणींवर कारवाई तर करण्यात आलीच आहे. दरम्यान धक्कादायक म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये पुरुष देखील मागे नाही येत. त्यामुळे आता पुरुषांना लाडकी बहीण योजनेचे हे पैसे परत करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेतून लाभ मिळवणाऱ्या पुरुषांकडून पैसे परत करण्याच्या दृष्टिकोनातून महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं होतं की जे पुरुष लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे घेत आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार याबाबत प्रक्रिया सुरू असल्यास देखील आदिती तटकरे यांनी सांगितल आहे.
लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत पैसे मिळवण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावे. अशी अट घालण्यात आली होती. दरम्यान तब्बल 1 कोटी 67 लाखाच्या घरात महिलांनी या योजनेअंतर्गत लाभ मिळवला. दरम्यान योग्य लाभार्थ्यांनाच याचा फायदा मिळावा यासाठी केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये 62 लाख महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही.
-अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न असूनही लाभ घेणाऱ्या भगिनींची संख्या 16 लाख होती. ती बंद करण्यात आली आहे.
-कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकर असून देखील लाभ घेणाऱ्या भगिनी 4.42 लाख होत्या. त्यांचीही योजना बंद करण्यात आलेली आहे.
-संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची ही लाडकी बहिणी योजना रद्द करण्यात आलेली आहे. यामध्ये 3.6 लाख महिला पात्र ठरल्या आहेत.
-एकाच कुटुंबातून दोन पेक्षा अधिक लाभार्थ्यांची संख्या 2.5 लाख होती. अशा महिलांची देखील ही योजना रद्द करण्यात आली आहे.