पुणे : केतन अग्रवाल या तरुणाच्या Ketan Murder Case Update मृत्यूनंतर अटकेत असलेले संशयित आरोपी सिया गोयल Siya Goyal आणि चेतन चौधरी Chetan Choudhari यांनीच ही हत्या केली होती. हे सिद्ध करण्यासाठी पोलीस अनेक मार्गाने तपास करत आहेत. दरम्यान आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. ती म्हणजे सिया आणि चेतन यांनी केतनला मारण्यासाठी आधी एका कॉन्ट्रॅक्ट किलरला देखील कॉन्टॅक्ट केला असल्याचं समजत आहे. दरम्यान या दोन्हीही संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडी आता 29 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे.
उद्योजक केतन अगरवाल या तरुणान आपला जीव गमावला आहे. त्याची हत्या नेमकी कशी करण्यात आली. याबाबत पोलीस तपास अत्यंत बारकाईने सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत घर-दार, काही महिन्यांपासून सिया आणि चेतन गेले होते ते सर्व हॉटेल्स, ती सर्व पर्यटन स्थळ, मंदिरे आणि काय नाही ते पिंजून काढले. दरम्यान सध्या एक नवीन पुरावा देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. तो म्हणजे सिया आणि चेतन यांनी सुरुवातीला केतनला मारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलरला देखील कॉन्टॅक्ट केला असल्याच समजत आहे. ते दोघेजण या कॉन्ट्रॅक्टरला नेमकं कोणत्या हॉटेलमध्ये भेटले हे देखील पोलिसांना समजलं असून सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाले आहे असं समजते आहे.
दरम्यान केतन अग्रवाल यांची हत्या करायची आहे हे समजल्यानंतर या कॉन्ट्रॅक्ट किलरने नकार दिला होता. आता पोलिसांनी याच कॉन्ट्रॅक्ट किलरला मोठा साक्षीदार करण्याचे नियोजन केले आहे असे देखील समजते आहे.
सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल यांच्या हत्येसाठी मोठा अभ्यास देखील केल्याचे लक्षात येते. वेगवेगळ्या वेब सिरीज, जपानी व्हिडिओज यांमधून हत्या नेमकी कशी करावी ? जेणेकरून आपण सापडणार नाही, पुरावे मागे राहू नयेत यासाठी गडावरून धक्का देण्याचा देखील कट त्यांनी रचला होता, म्हणजे कोणतेही हत्यार मिळू शकणार नाही. पोलिसांनी पकडले तर त्यांच्याशी कसे बोलायचे ? पोलीस काय विचारू शकतात ? असा अभ्यास देखील त्यांनी केला होता. हे सर्व काही खूप भयानक आहे.