KETAN MURDER CASE : केतनच्या वडिलांचे राष्ट्रपतींना विनंती पत्र ! न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे कुटुंबाच्या वेदना वाढत आहेत.. - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुण्यामध्ये काही दिवसांपासून केतन अग्रवाल Ketan Agarwal या युवकाच्या हत्येप्रकरणी Murder Case मोठा गदारोळ सुरू आहे. रोजच या घटनेबाबत वेगवेगळे उलगडे होत आहेत. दरम्यान हतबल होऊन आता केतन अग्रवाल यांच्या वडिलांनी थेट राष्ट्रपतींकडेच न्याय मागितला आहे. 

अग्रवाल कुटुंबाबरोबर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. केतनची हत्या सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी केली असल्याबाबत दोन्हीही संशयित आरोपींविरोधात तपास यंत्रणा तत्परतेने काम करत आहेत. पण केतनच्या मृत्यूनंतर आलेला मानसिक तणाव यामुळे अवघ्या वीसच दिवसात केतनच्या आजोबांचा देखील मृत्यू झाल्याची बातमी मिळते आहे. या सर्व अत्यंत वेदनादायी घटनांमुळे आणि न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे केतनच्या वडिलांनी थेट राष्ट्रपतींना विनंती पर पत्र लिहिले आहे. 

रात्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या या विनंतिपर पत्रामध्ये त्यांनी या पत्रामध्ये "न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे कुटुंबाच्या वेदना वाढत असून याप्रकरणी तातडीने फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन आरोपींना कायद्यानुसार शक्य असलेली कठोरातील कठोर शिक्षा दिली जावी. अशा गृहस्पद गुन्ह्यांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आरोपींना कठोर शिक्षा मिळावी." असं म्हटलं आहे. 

संशयित आरोपी सिया गोयल Siya Gpoyal आणि चेतन चौधरी Chetan Choudhari हे दोघेजण पोलीस कोठडीमध्ये आहेत. त्यांच्या विरोधात सर्व सबळ पुरावे जमवण्याचे काम तपास यंत्रणा करत आहेत.