पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल Ketan Agarwal या तरुणाच्या हत्येप्रकरणी Ketan Agrawal Murder Case सिया गोयल Siya Goyal आणि चेतन चौधरी Chetan Choudhari हे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. येत्या तीन जुलैला म्हणजे उद्या पर्यंत या दोघांची कस्टडी पोलिसांकडे आहे. तत्पूर्वी पोलिसांना या घटनेचे सर्व धागेदोरे आवळण गरजेच आहे. आज पोलिसांनी थेट सिया गोयल हिच्या घरी जाऊन तासभर घराची झाडाझडती घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पोलीस सिया गोयल हिला घेऊन तिच्या घरी गेले होते. घरी जाऊन सियान घटनेच्या दिवशी नेमके कोणते कपडे घातले होते. ते कपडे देखील आज पोलिसांनी जप्त केलेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी लोहगडावर नेमकं केतनला कसं ढकलून द्यायचं याचा सराव केला होता. त्या टेकडीवर जाऊन देखील पंचनामा केला आहे. त्याचबरोबर घटना घडण्याच्या आधी आणि घटना घडल्यानंतर ज्या ठिकाणी सिया गेली होती ते प्रत्येक ठिकाण देखील पोलिसांनी पिंजून काढलय.
सिया गोयल हिच्या घरातून घटनेच्या दिवशी तिने घातलेले कपडे तिचा मोबाईल जप्त करण्यात आला असून आता तिच्या कपड्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर नुकत्याच मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार सियाची लाय डिटेक्टर तपासणी देखील केली जाणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नेमकं काय वळण मिळतं हे लवकरच स्पष्ट होईल.
केतन अगरवाल हे एक मोठे उद्योगपती यांचे चिरंजीव होते. केतन आणि सिया गोयल या दोघांचा नोव्हेंबरमध्ये विवाह होणार होता. दरम्यान सिया आणि चेतन चौधरी नामक तिच्या प्रियकरानं 18 जून रोजी कट रचून केतन अग्रवाल यांना लोहगड वरून तीनशे फूट दरीमध्ये ढकलून देऊन त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी तपास सुरू आहे.