Kangana Ranaut : "त्यांनी जे म्हटलंय ते अगदी योग्यच असणार.."; कंगनाच्या पोस्टवरून काय म्हणाल्या मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित - टॉप न्यूज मराठी

मुंबई : काल पासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच चर्चेत आहे. कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला हिंदू तरुणींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. तिने थेट हिंदू तरुणीना गटार छाप, ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि अनेक लोकांशी शारीरिक संबंध असल्याचे म्हटले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर कंगनावर टीकेची झोड उठली आहे. अनेकजण कंगनाला चांगलेच सुनावताना दिसत आहे. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेल्या व्यक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमितने एका मुलाखतीमध्ये कंगनावर तिखट शब्दात टीका केली आहे. "त्या जेव्हा वक्तव्य करतात, ती वादग्रस्तच असतात किंवा वाद व्हावा म्हणूनच त्या बहुदा बोलतात" असे चिन्मयी सुमित म्हणाल्या , "कंगना रनौत अत्यंत अभ्यासू आहे. अभ्यास केल्याशिवाय त्या कधीच काही बोलत नाहीत, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले, या वाक्यालाच काहीच अर्थ नाही... त्या जेव्हा वक्तव्य करतात, ती वादग्रस्तच असतात किंवा वाद व्हावा म्हणूनच त्या बहुदा बोलतात... त्यामुळे छान आहे, त्यांनी जे म्हटलंय ते अगदी योग्यच असणार... कारण त्या त्यावेळेस संसदेच्या खिडकीतून बघत असणार की, कोण आलेत समोर...? पोलिसांचे कौतुक केले होते. जर ही मुले आत आली असती तर त्यांनी काय केले असते माहीत नाही. आता त्यांनी कुठून बघितले की, विद्यार्थी होते की, नव्हते हे मला खरंच कळत नाहीये... पण जर त्या म्हणतायत तर त्यांना कोणतीतरी आंतरिक शक्ती मिळाली असेल, ज्यामुळे त्यांना माहीत आहे की, ते विद्यार्थी कोण आहेत. किंवा आंदोलनात विद्यार्थी नाहीच आहेत, हे त्यांना माहीत आहे. त्या अगाध आहेत, मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो..." असे त्या म्हणाल्या.

चिन्मयी सुमित यांनी एक अभिनेत्री म्हणून कंगना रणौतच्या कामाचा आदर करत असल्याचे म्हटले. "हे मी अत्यंत मनापासून सांगत आहे की, त्या उत्तम अभिनेत्री आहेत. 'क्वीन'मध्ये त्या मला खूप आवडल्या होत्या. आणि आता त्यांनी ही जी भूमिका करायला घेतली आहे, त्यातसुद्धा त्या आपले शंभर टक्के देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे जे काही सुरू आहे की, सतत काहीतरी निरर्थक आणि बेसलेस गोष्टी बोलत राहायच्या तर ते त्या करत आहेत" असे त्या म्हणाल्या.