Kalashri : कलाश्री तर्फे २६ व २७ सप्टेंबर रोजी गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन - टॉप न्यूज मराठी

पुण्यातील कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने येत्या शनिवार दि. २६ सप्टेंबर व रविवार दि. २७ सप्टेंबर रोजी गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायं ७ वाजे दरम्यान शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश येईल, अशी माहिती आयोजकांच्या वतीने कळविण्यात आली आहे.

किराणा घराण्याचे गायक पं. सुधाकर चव्हाण यांच्या शिष्यांच्या वतीने ‘गुरुवंदना’ या कार्यक्रमादरम्यान पं. श्रीकांत देशपांडे आणि डॉ. सुधाकर मराठे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येईल. कार्यक्रमास सांगवी येथील दत्त आश्रमाचे तुकाराम भाऊ,  द औंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित गायकवाड आणि टेकएक्स्पर्ट इंजि. प्रा. लि.या संस्थेचे व्यवस्थापकीय अध्यक्ष असलेल्या जे. व्ही. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

पं सुधाकर चव्हाण याच्या शिष्यांच्या गायनाला पं. प्रभाकर पांडव, गंगाधर शिंदे, हरिभाऊ आसतकर हे संवादिनीवर, पं. विश्वास जाधव, किशोर कोरडे, नंदकिशोर ढोरे, रामदास कुलकर्णी, सर्वेश बाद्रायणी, स्मितीश कुर्वे, आदित्य पवार हे तबला तर हर्षल जाधव, पखवाज, रघुनाथ राउत, मकरंद बाद्रायणी हे टाळसाथ करतील. कार्यक्रमाचे निवेदन आकाश थिटे, इरा सोनावणे व मृदुला कुलकर्णी हे करणार आहेत.