पुणे : कृषी विभागाच्या पुणे विभागात विधी अधिकारी / विधिज्ञ पदासाठी एका जागेवर नेमणूक होणार आहे. यासाठी पात्र वकिलांनी 21 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे पद पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांसाठी असेल. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आणि शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या कोर्ट केसेस सांभाळण्यासाठी ही नेमणूक आहे.
1) उमेदवाराकडे वकिलीचा परवाना असावा आणि महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलमध्ये नोंदणी असावी.
2) हायकोर्ट, जिल्हा आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगात किमान 10 वर्षांचा अनुभव हवा.
3) अपघात विमा, नागरी दावे, नुकसान भरपाईच्या केसेसचा अनुभव असावा.
4) सरकारी केसेस हाताळल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
बार कौन्सिलच्या नियमानुसार मानधन मिळेल. राज्य ग्राहक आयोगातील प्रति केस 50,000 रुपये आणि जिल्हा आयोगातील प्रति केस 10,000 रुपये दिले जातील.