जेजुरीतून या क्षणाची मोठी बातमी समोर आली असून वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झालाय या अपघातात तीन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे...
जेजुरी परिसरात वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाचा जोरदार अपघात झालाय. या भीषण दुर्घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्व जखमी वारकऱ्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचं नेमकं कारण मात्र समजू शकले नाही...