INFORMATIVE : जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी 5 नवीन आणि भन्नाट फीचर्स आणले आहेत. हे फीचर्स सध्या बीटा वर्जनमध्ये टेस्ट केले जात असून लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहेत. यापैकी काही फीचर्समुळे तुमचा चॅटिंगचा अनुभव पूर्णपणे बदलून जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे 5 नवीन फीचर्स.
हे सर्वात चर्चेत असलेले फीचर आहे. अनेकदा समोरची व्यक्ती मेसेज पाठवून लगेच डिलीट करते आणि आपल्याला तो मेसेज काय होता हे कळत नाही. आता WhatsApp ने यावर उपाय शोधला आहे. नवीन अपडेटनंतर जर एखाद्याने तुमच्यासाठी पाठवलेला मेसेज डिलीट केला, तर तुम्हाला Keep या ऑप्शनवर क्लिक करून तो मेसेज सेव्ह करता येणार आहे. अर्थात, मेसेज पाठवणाऱ्याने परवानगी दिली तरच तो मेसेज सेव्ह होईल. यामुळे चुकून डिलीट झालेले महत्त्वाचे मेसेज परत मिळवता येतील.
आत्तापर्यंत आपण View Once फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकत होतो. आता हेच फीचर व्हॉईस मेसेजसाठी देखील आले आहे. तुम्ही एखादा खासगी व्हॉईस मेसेज पाठवला तर तो समोरच्या व्यक्तीने एकदा ऐकल्यानंतर आपोआप डिलीट होईल. यामुळे तुमचे खासगी संभाषण अधिक सुरक्षित राहणार आहे. हे फीचर ओटीपी किंवा पासवर्ड सारखी गोपनीय माहिती पाठवण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.
हे फीचर गुगलच्या Nearby Share सारखे काम करेल. आता मोठी फाईल, फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यासाठी इंटरनेटची गरज लागणार नाही. तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या व्यक्तीला ब्लूटूथ आणि वायफायच्या मदतीने हाय स्पीडमध्ये फाईल पाठवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुमचे लोकेशन किंवा मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज नाही. फक्त दोन्ही मोबाईल जवळ असणे आवश्यक आहे. ही फाईल ट्रान्सफर पूर्णपणे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असेल.
आत्तापर्यंत WhatsApp स्टेटसवर फक्त 30 सेकंदाच व्हिडिओ टाकता येत होता. त्यामुळे मोठा व्हिडिओ अनेक भागांमध्ये कट करून टाकावा लागत होता. आता कंपनीने ही मर्यादा वाढवून 1 मिनिट केली आहे. त्याचबरोबर आता फोटो किंवा व्हिडिओ ऐवजी तुम्ही फक्त ऑडिओ स्टेटस देखील ठेवू शकता. म्हणजेच तुम्हाला एखादे गाणे किंवा तुमचा आवाज स्टेटस म्हणून ठेवता येईल.
WhatsApp ने आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय चा वापर सुरू केला आहे. आता तुम्ही एआय च्या मदतीने स्वतःचे स्टिकर तयार करू शकता. फक्त तुम्हाला कसा स्टिकर हवा आहे ते लिहा, एआय लगेच तुमच्यासाठी स्टिकर बनवून देईल. याशिवाय चॅट लॉक फीचरमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. आता तुम्ही लॉक केलेले चॅट्स लपवू शकता आणि त्यासाठी एक सिक्रेट कोड सेट करू शकता. तो कोड टाकल्याशिवाय ते चॅट दिसणारच नाही.
हे सर्व फीचर्स मिळवण्यासाठी तुमचे WhatsApp नेहमी अपडेट ठेवा. गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअर मध्ये जाऊन WhatsApp अपडेट करा. काही फीचर्स सध्या बीटा टेस्टरसाठी उपलब्ध आहेत, त्यामुळे सर्वांना मिळण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.