Informative : आजकाल प्रत्येक जण गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या यु पी आय अॅपने पेमेंट करतो. पण अनेक वेळा असे होते की आपल्या खात्यातून पैसे कट होतात पण दुकानदाराला किंवा समोरच्या व्यक्तीला पैसे मिळत नाहीत. अशा वेळी घाबरून जायची गरज नाही. हा पैसा कुठेही जात नाही. तो काही वेळात परत येतो. पण कधी कधी 24 तास झाले तरी परत येत नाही, तेव्हा काय करावे याची संपूर्ण प्रोसेस आपण जाणून घेऊ.
पैसे का अडकतात याची कारणे -
यु पी आय पेमेंट करताना इंटरनेट स्लो असेल, बँकेचा सर्व्हर डाऊन असेल किंवा समोरच्या बँकेचा सर्व्हर व्यस्त असेल तर व्यवहार पेंडिंग मध्ये जातो. तुमच्या बँकेने पैसे पाठवले पण समोरच्या बँकेने ते स्वीकारले नाहीत तर पैसे मध्ये अडकतात. याला टेक्निकल भाषेत डिम्ड फेल्युअर म्हणतात.
पहिली 2 मिनिटे काय करावे -
पेमेंट फेल झाल्याचा मेसेज आला तर लगेच दुसरे पेमेंट करू नका. आधी तुमच्या यु पी आय अॅप मध्ये ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासा. तिथे पेंडिंग दाखवत असेल तर 5 मिनिटे थांबा. अनेक वेळा 2 ते 3 मिनिटात पैसे आपोआप परत येतात किंवा समोरच्याला मिळतात. तसेच तुमच्या बँकेचा मेसेज आला आहे का ते पहा. पैसे कट झाल्याचा मेसेज आला असेल तर ट्रान्झॅक्शन आयडी कॉपी करून ठेवा. हा आयडी पुढे तक्रार करताना लागतो.
24 तासाच्या आत पैसे परत कसे येतात -
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार जर यु पी आय व्यवहार फेल झाला आणि पैसे कट झाले तर बँकेला ते पैसे 24 तासाच्या आत ग्राहकाच्या खात्यात परत जमा करावे लागतात. काही बँका ते 1 तासातच परत करतात. जर 24 तास झाले तरी पैसे परत आले नाहीत तर तुम्हाला तक्रार करावी लागेल.
तक्रार करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस -
स्टेप 1 - यु पी आय अॅप मध्ये तक्रार करा. गुगल पे मध्ये हिस्ट्री मध्ये जाऊन त्या व्यवहारावर क्लिक करा आणि हेल्प वर क्लिक करून इश्यू रेज करा. फोन पे मध्ये सपोर्ट मध्ये जाऊन तक्रार करा. तिथे तुम्हाला ट्रान्झॅक्शन आयडी टाकावा लागेल.
स्टेप 2 - तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर ला कॉल करा. बँकेच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून त्यांना यु पी आय ट्रान्झॅक्शन आयडी सांगा. ते तुम्हाला तक्रार क्रमांक देतील.
स्टेप 3 - एन पी सी आय ला तक्रार करा. जर बँकेने 3 दिवसात उत्तर दिले नाही तर तुम्ही एन पी सी आय च्या वेबसाईटवर म्हणजेच यु पी आय चालवणाऱ्या कंपनीकडे तक्रार करू शकता. http://npci.org.in वर डिस्प्युट रिड्रेसल मध्ये जाऊन फॉर्म भरा.
स्टेप 4 - बँकिंग लोकपाल कडे तक्रार करा. जर 30 दिवसात पैसे परत आले नाहीत तर तुम्ही आर बी आय च्या बँकिंग लोकपाल कडे तक्रार करू शकता. http://cms.rbi.org.in या पोर्टलवर तक्रार करता येते.
पैसे लवकर परत मिळवण्यासाठी टिप्स -
नेहमी यु पी आय पेमेंट करताना स्क्रीनशॉट काढून ठेवा.
मोठे पेमेंट करताना आधी 1 रुपया पाठवून टेस्ट करा.
रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत बँक सर्व्हर मेंटेनन्स असतो, तेव्हा मोठे पेमेंट टाळा.
एकाच वेळी दोन वेळा पेमेंट करू नका.
जर दुकानदार म्हणत असेल पैसे आले नाहीत तर त्याला पेंडिंग दाखवा आणि 24 तास थांबायला सांगा. अनेक वेळा त्याच्या खात्यात उशिरा पैसे जमा होतात. तुमच्याकडे ट्रान्झॅक्शन सक्सेसचा पुरावा असेल तर तुम्ही निश्चिंत राहू शकता.