Informative : गाडीची PUC संपलीय का ? पकडले तर 10000 पर्यंत दंड, घरी बसून 2 मिनिटात अशी चेक आणि रिन्यू करा - टॉप न्यूज मराठी

तुमच्याकडे बाईक असो किंवा कार, PUC म्हणजे Pollution Under Control सर्टिफिकेट हे असणे बंधनकारक आहे. हे सर्टिफिकेट सांगते की तुमच्या गाडीतून निघणारा धूर हा सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे. अनेक जण PUC काढतात आणि विसरून जातात, पण जर PUC संपले असेल आणि तुम्ही पकडले गेलात तर पहिल्यांदा 1000 रुपये आणि दुसऱ्यांदा 2000 ते 10000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आता PUC चेक करण्यासाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या मोबाईलवर चेक करू शकता.

PUC स्टेटस असे चेक करा 

सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये Parivahan हा सरकारी वेबसाईट ओपन करा. तिथे PUC Certificate या पर्यायावर क्लिक करा. आता तुमचा गाडी नंबर आणि चेसिस नंबरचे शेवटचे 5 अंक टाका. तुमच्या समोर तुमचे PUC सर्टिफिकेट आहे की नाही, कधी संपणार आहे हे दिसेल.

PUC संपले असेल तर काय करायचे 

PUC ऑनलाईन रिन्यू होत नाही, त्यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर किंवा अधिकृत सेंटरवर जावे लागते. पण तिथे गेल्यावर फक्त 2 मिनिटे लागतात. सेंटरवर तुमच्या गाडीच्या सायलेन्सरमध्ये एक मशीन टाकली जाते, त्यातून धुराची तपासणी होते. जर सर्व काही ठीक असेल तर 5 मिनिटात तुमचे नवीन सर्टिफिकेट मिळते. यासाठी बाईकसाठी 60 ते 100 रुपये आणि कारसाठी 100 ते 150 रुपये फी घेतली जाते.

काही गोष्टी लक्षात ठेवा 

नवीन गाडीसाठी पहिल्या एका वर्षासाठी PUC ची गरज नसते, पण एक वर्षानंतर दर 6 महिन्यांनी PUC काढणे गरजेचे आहे. जर तुमची गाडी जास्त धूर सोडत असेल तर आधी सर्व्हिसिंग करा आणि मगच PUC साठी जा, नाहीतर तुम्ही फेल होऊ शकता. नेहमी PUC ची झेरॉक्स किंवा मोबाईलमधील कॉपी गाडीत ठेवा, जेणेकरून पोलीस थांबवतील तेव्हा दाखवता येईल.