INFORMATIVE : ATM मधून पैसे काढताना ही 1 चूक केली तर खाते 5 मिनिटात खाते होईल रिकामे - टॉप न्यूज मराठी

आजकाल सर्वजण ATM मधून पैसे काढतात. पण ATM मधून पैसे काढताना एक छोटीशी चूक तुमचे पूर्ण बँक खाते रिकामे करू शकते. सायबर पोलिसांच्या माहितीनुसार गेल्या महिन्यात अशा प्रकारे शेकडो लोकांची फसवणूक झाली आहे. चोरट्यांनी ATM मध्ये एक नवीन ट्रिक लावली आहे. त्यामुळे पैसे काढताना खूप काळजी घ्यावी लागते.

कोणती चूक करू नये?

  • अनेक लोक ATM मधून पैसे काढताना आजूबाजूला कोणी आहे का हे पाहत नाहीत. हेच चोरट्यांसाठी सर्वात मोठे कारण आहे. तुम्ही पिन टाकताना जर कोणी मागे उभा राहून तुमचा पिन पाहिला तर तुमचे खाते 5 मिनिटात रिकामे होऊ शकते. याला शोल्डर सर्फिंग असे म्हणतात.

  • दुसरी मोठी चूक म्हणजे ATM मशीनमध्ये कार्ड टाकण्याची जागा चेक न करणे. चोरटे त्या ठिकाणी एक छोटेसे उपकरण लावतात ज्याला स्किमर म्हणतात. तुम्ही कार्ड टाकताच तुमच्या कार्डचा पूर्ण डेटा त्या उपकरणात कॉपी होतो. आणि वरच्या बाजूला एक छोटा कॅमेरा लावतात जो तुमचा पिन रेकॉर्ड करतो.

फसवणूक कशी होते ?

तुम्ही पैसे काढून गेल्यानंतर चोरटे त्या स्किमर मधून तुमच्या कार्डची माहिती काढतात. आणि त्या माहितीने दुसरे डुप्लिकेट कार्ड बनवतात. मग तुमच्या पिनचा वापर करून दुसऱ्या ATM मधून तुमचे सर्व पैसे काढतात. हे सर्व काम फक्त 5 मिनिटात होते. तुम्हाला मेसेज येईपर्यंत खाते रिकामे झालेले असते.

बचावासाठी काय करावे?

1. ATM मध्ये शिरताना दरवाज्याचे लॉक व्यवस्थित लागते का ते पहा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आत येऊ देऊ नका.

2. पिन टाकताना नेहमी दुसऱ्या हाताने कीपॅड झाका. जेणेकरून मागचा व्यक्ती किंवा कॅमेरा तुमचा पिन पाहू शकणार नाही.

3. कार्ड टाकण्याची जागा हलते का ते चेक करा. जर ती जागा सैल असेल किंवा वेगळी वाटत असेल तर त्या ATM मधून पैसे काढू नका.

4. ATM मधून पैसे काढल्यानंतर आलेली पावती तिथेच फाडून टाकू नका. त्या पावतीवर तुमच्या खात्याची माहिती असते. ती घरी आणून नष्ट करा.

5. पैसे काढल्यानंतर लगेच मोबाईलवर बॅलन्स चेक करा. जर काही संशय आला तर ताबडतोब बँकेला फोन करून कार्ड ब्लॉक करा.

6. शक्यतो बँकेच्या आत असलेल्या ATM मधूनच पैसे काढा. रस्त्यावरच्या एकट्या असलेल्या ATM मध्ये ही फसवणूक जास्त होते.

जर तुमच्यासोबत असे काही झाले तर घाबरू नका. 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर लगेच कॉल करा. आणि तुमच्या बँकेला माहिती द्या. 24 तासाच्या आत तक्रार केल्यास तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पुढच्या वेळी ATM मध्ये गेल्यावर ही एक चूक टाळा आणि आपले खाते सुरक्षित ठेवा.