INFORMATIVE : मोबाईल स्लो झालाय ? बॅटरी लवकर संपते, नवीन मोबाईल घेण्याआधी हे 7 उपाय करून बघा, फोन नवीनसारखा चालेल - टॉप न्यूज मराठी
INFORMATIVE : मोबाईल दोन तीन वर्षे जुना झाला की हळू चालायला लागतो, बॅटरी लवकर संपते आणि स्टोरेज फुल झाले असा मेसेज येतो. त्यावेळी अनेकांना वाटते की आता नवीन मोबाईल घ्यावाच लागेल. पण नवीन मोबाईल घेण्याआधी हे 7 छोटे उपाय करून बघा, तुमचा मोबाईल पुन्हा नवीनसारखा चालेल.
- पहिला उपाय म्हणजे स्टोरेज साफ करणे. व्हॉट्सअॅपवर येणारे फोटो, व्हिडिओ, डबल फोटो यामुळे स्टोरेज भरते. आठवड्यातून एकदा अनावश्यक फोटो आणि व्हिडिओ डिलीट करा. गुगल फोटोजमध्ये बॅकअप घेऊन फोनमधले फोटो डिलीट केले तरी चालतील.
- दुसरा उपाय म्हणजे वापरत नसलेले अॅप डिलीट करणे. अनेक अॅप आपण एकदाच वापरतो आणि विसरून जातो. पण ते बॅकग्राऊंडला चालत राहतात आणि मोबाईल हळू करतात.
- तिसरा उपाय म्हणजे बॅटरी वाचवणे. ब्राईटनेस कमी ठेवा, लोकेशन, ब्लूटूथ गरज नसेल तेव्हा बंद ठेवा. चार्जिंग करताना मोबाईल वापरू नका. रात्री झोपताना 100 टक्के चार्ज करून ठेवण्याची सवय टाळा.
- चौथा उपाय म्हणजे कॅश क्लिअर करणे. सेटिंगमध्ये जाऊन अॅपची कॅश साफ केली की मोबाईल वेगात चालतो.
- पाचवा उपाय म्हणजे मोबाईल अपडेट ठेवणे. सॉफ्टवेअर अपडेटमध्ये हळू होण्याच्या समस्या दूर केल्या जातात.
- सहावा उपाय म्हणजे अनोळखी लिंकवर क्लिक न करणे आणि अनोळखी अॅप इन्स्टॉल न करणे. यामुळे मोबाईलमध्ये व्हायरस येत नाही.
- सातवा उपाय म्हणजे महिन्यातून एकदा मोबाईल रीस्टार्ट करणे. यामुळे मोबाईलला नवीन ऊर्जा मिळते.
हे 7 उपाय केले तर नवीन मोबाईल घेण्याची गरज पडणार नाही.