आधार कार्ड हे आज प्रत्येकासाठी महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. बँकेत खाते उघडायचे असो, सरकारी योजना असो किंवा सिम कार्ड घ्यायचे असो, सगळीकडे आधार लागतो. अनेकदा आधार कार्ड हरवते किंवा खराब होते, अशा वेळी घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून अवघ्या दोन मिनिटात तुमचे आधार कार्ड पुन्हा डाउनलोड करू शकता.
आधार डाउनलोड कसा करायचा
सगळ्यात आधी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. http://myaadhaar.uidai.gov.in ही वेबसाईट ओपन करा. तिथे Download Aadhaar असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतील, आधार नंबर, एनरोलमेंट आयडी किंवा व्हर्च्युअल आयडी. तुमच्याकडे जे असेल ते निवडा. जर आधार नंबर लक्षात असेल तर तो टाका. नसेल तर एनरोलमेंट नंबरनेही डाउनलोड करता येते.
त्यानंतर तुमचा आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा टाका. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यानंतर तुमचे आधारचे डिटेल्स स्क्रीनवर दिसतील.
तिथे तुम्हाला ई-आधार डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर तुमचे आधार पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होईल. या पीडीएफचा पासवर्ड तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि जन्म वर्ष असतो. उदाहरणार्थ नाव AMOL आणि जन्म 1995 असेल तर पासवर्ड AMOL1995 असा असेल.
हे ई-आधार सगळीकडे ओरिजनल आधार प्रमाणेच वैध असते. तुम्ही याची प्रिंट काढून लॅमिनेशन करून वापरू शकता. जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळच्या आधार केंद्रात जाऊन तुम्हाला मोबाईल अपडेट करावा लागेल.