पोस्ट ऑफिसमध्ये महिलांसाठी अनेक बचत योजना आहेत ज्यात कमी गुंतवणूक करून जास्त परतावा मिळतो. या योजना पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि सरकारची गॅरंटी आहे. घर सांभाळणाऱ्या महिलांपासून नोकरी करणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांसाठी या योजना फायदेशीर आहेत. जाणून घेऊया अशाच 5 योजना.
1. पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत योजना
ही योजना खास महिलांसाठीच सुरु करण्यात आली आहे. यात तुम्ही 1000 रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत 7.5 टक्के व्याजदर मिळतो. फक्त 2 वर्षात पैसे दुप्पट होण्यास मदत होते. खाते फक्त 2 वर्षांसाठी असते आणि मुदतीनंतर पूर्ण पैसे व्याजासह मिळतात.
2. सुकन्या समृद्धी योजना
जर तुमच्या घरात 10 वर्षांखालील मुलगी असेल तर ही योजना बेस्ट आहे. यात वर्षाला 250 रुपयांपासून ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या 8.2 टक्के व्याज मिळत आहे जे इतर योजनांपेक्षा जास्त आहे. मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. 21 वर्षानंतर मोठी रक्कम मिळते.
3. पोस्ट ऑफिस RD योजना
दर महिन्याला थोडी थोडी बचत करायची असेल तर RD उत्तम पर्याय आहे. यात तुम्ही फक्त 100 रुपयांपासून RD सुरु करू शकता. 5 वर्षांसाठी 6.7 टक्के व्याज मिळते. महिला दर महिन्याला 1000, 2000 अशी बचत करू शकतात आणि 5 वर्षानंतर एक मोठी रक्कम हातात येते.
4. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना
ही FD सारखी योजना आहे. यात 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी पैसे गुंतवता येतात. 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. एकरकमी रक्कम असेल तर या योजनेत टाकल्यास दरवर्षी चांगले व्याज मिळते. 5 वर्षांच्या TD वर टॅक्समध्ये सूट पण मिळते.
5. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
जर तुम्हाला दर महिन्याला उत्पन्न हवे असेल तर ही योजना तुमच्यासाठी आहे. यात एकदा पैसे गुंतवले की दर महिन्याला व्याज तुमच्या खात्यात येते. 7.4 टक्के व्याजदर आहे. जास्तीत जास्त 9 लाख रुपये एका खात्यात आणि पती पत्नीचे जॉईंट खाते असेल तर 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
या सर्व योजना पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्डवर लगेच सुरु होतात. गुंतवणूक करण्यापूर्वी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन व्याजदराची खात्री करून घ्या.