INFORMATIVE : पॅन कार्ड 1 एप्रिल पासून बंद होणार ? सरकारचा नवीन नियम लागू, जाणून घ्या नाहीतर बँकेचे काम अडकेल, सत्य काय ? - टॉप न्यूज मराठी

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून बंद होणार आहे. पण हे अर्धसत्य आहे. सरकारने पॅन कार्ड बंद केलेले नाही तर पॅन कार्ड काढण्याचे नियम 1 एप्रिल 2026 पासून कडक केले आहेत.

Income Tax Department आणि CSC e-Governance ने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

काय आहे नवीन नियम?

1 एप्रिल 2026 आधी तुम्ही फक्त आधार कार्डच्या आधारे 5 मिनिटात पॅन कार्ड काढू शकत होता. OTP आला की e-PAN मिळायचा. पण आता ही सुविधा बंद झाली आहे.

1 एप्रिल 2026 पासून नवीन नियम काय आहेत?

1. फक्त आधारने पॅन मिळणार नाही: आता आधार सोबत जन्माचा दाखला द्यावा लागणार आहे. यासाठी जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID किंवा 10 वी चे सर्टिफिकेट द्यावे लागेल.

2. नावात चूक चालणार नाही: आधी पॅन कार्डवर नाव थोडे वेगळे असले तरी चालायचे. पण आता पॅन कार्डवरील नाव हे आधार कार्डवरील नावाशी 100 टक्के जुळलेच पाहिजे. एका अक्षराची जरी चूक असेल तर अर्ज रिजेक्ट होईल.

3. जुने फॉर्म बंद: जुना 49A फॉर्म आता चालणार नाही. सरकारने नवीन Form 93 आणला आहे. 1 एप्रिल नंतर जुन्या फॉर्मने अर्ज केलात तर तो बाद होईल.

4. व्यवहारांसाठी मर्यादा वाढली: 10 लाखांपेक्षा जास्त कॅश डिपॉझिट, 20 लाखांची प्रॉपर्टी खरेदी आणि 5 लाखांची गाडी घेताना पॅन दाखवणे बंधनकारक असेल.

तुम्ही काय करावे?

  • जर तुमचे पॅन कार्ड आधारला लिंक नसेल तर ते आधी लिंक करा. तुमच्या आधारवरील नाव, जन्मतारीख बरोबर आहे का ते चेक करा. जर चूक असेल तर आधी आधार दुरुस्त करा. कारण पॅन आता आधार प्रमाणेच बनणार आहे.
  • पॅन कार्ड बंद होणार या अफवेवर विश्वास ठेवू नका. पॅन कार्ड हे बँक खाते, ITR भरणे आणि कोणत्याही मोठ्या व्यवहारासाठी अजूनही सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे.
  • सरकार लवकरच PAN 2.0 आणत आहे ज्यात QR कोड असलेले नवीन पॅन कार्ड मिळेल. त्यामुळे घाबरून जाऊ नका पण तुमची कागदपत्रे अपडेट ठेवा.

Disclaimer - नियमांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत http://incometax.gov.in या वेबसाईटला भेट द्या.