तुमच्यासोबत कधी असे झाले आहे का, तुम्ही मित्राशी पिझ्झा बद्दल बोललात आणि दुसऱ्या मिनिटाला इंस्टाग्रामवर पिझ्झाची जाहिरात आली. किंवा तुम्ही नवीन शूज घ्यायचा विचार मनात बोलून दाखवला आणि लगेच फोनवर शूजचे ऑप्शन दिसू लागले. अनेकांना वाटते आपला मोबाईल आपले बोलणे चोरून ऐकतो. पण यामागचे सत्य काय आहे ते सविस्तर समजून घेऊया.
गुगल, फेसबुक, अॅपल या मोठ्या कंपन्या नेहमी सांगतात की आम्ही तुमचा माईक परवानगी शिवाय चालू करत नाही. फोनमध्ये जेव्हा तुम्ही ओके गुगल किंवा हे सिरी म्हणता तेव्हाच माईक काही सेकंदासाठी अॅक्टिव्ह होतो. पण तरीही लोकांचा विश्वास बसत नाही कारण जाहिराती अगदी अचूक येतात.
याचे उत्तर आहे डेटा ट्रॅकिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही काय बोलता हे फोन ऐकत नसला तरी तुम्ही काय करता हे फोन बरोबर ट्रॅक करतो.