IELTS न देताही परदेशात शिक्षण शक्य आहे, जर्मनीमध्ये मोफत शिक्षण आणि दुबईमध्ये कमी बजेटमध्ये डिग्री, स्कॉलरशिपसह संपूर्ण माहिती - टॉप न्यूज मराठी

प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते की परदेशात जायचे असेल तर IELTS द्यावाच लागतो, 7-8 बँड मिळवावे लागतात, तेव्हाच व्हिसा मिळतो. पण हे अर्धसत्य आहे. जगात असे 10 पेक्षा जास्त देश आहेत जिथे IELTS शिवाय तुम्ही शिक्षण घेऊ शकता. विशेषतः जर्मनी आणि दुबई हे दोन देश सध्या कमी बजेट असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑप्शन बनले आहेत.

IELTS शिवाय कोणते देश आहेत?

1. जर्मनी 2. दुबई म्हणजे UAE 3. फ्रान्स 4. पोलंड 5. मलेशिया

यापैकी जर्मनी आणि दुबईबद्दल आपण सविस्तर बोलू कारण तिथे नोकरीच्या संधी जास्त आहेत.

जर्मनीमध्ये शिक्षण - जवळपास मोफत

जर्मनीचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ट्युशन फी नाही. हो, हे खरे आहे. जर्मन सरकार शिक्षण मोफत देते, फक्त तुम्हाला सेमिस्टर फी म्हणून वर्षाला 300 ते 400 युरो म्हणजे 25 ते 35 हजार रुपये भरावे लागतात.

IELTS शिवाय कसे जायचे?

जर्मनीतील अनेक युनिव्हर्सिटीजना जर तुमचे मागील शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असेल तर IELTS माफ करतात. तुम्हाला तुमच्या कॉलेजकडून Medium of Instruction म्हणजे MOI नावाचे सर्टिफिकेट घ्यावे लागते की माझे शिक्षण इंग्रजीत झाले आहे. किंवा तुम्ही जर्मन भाषेचा A1 लेव्हलचा कोर्स केला तरी IELTS ची गरज पडत नाही.

खर्च किती येतो?

ब्लॉक अकाउंट - जर्मनी व्हिसासाठी तुम्हाला 11,208 युरो म्हणजे सुमारे 10 लाख रुपये ब्लॉक अकाउंटमध्ये दाखवावे लागतात. हे पैसे तुमचेच असतात, दर महिन्याला सरकार तुम्हाला 934 युरो परत देते खर्चासाठी.

राहणे आणि जेवण - महिन्याला 800 ते 900 युरो

पार्ट टाईम जॉब - विद्यार्थ्यांना आठवड्याला 20 तास काम करण्याची परवानगी आहे, त्यात महिन्याला 900 ते 1000 युरो कमवू शकता, त्यामुळे खर्च निघून जातो.

कोणते कोर्स फेमस आहेत - Mechanical, Automobile, Data Science, Nursing

दुबईमध्ये शिक्षण - कमी बजेट आणि जवळ

दुबईचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे भारतापासून 3 तासावर आहे, IELTS ची सक्ती नाही आणि व्हिसा 100 टक्के मिळतो.

IELTS शिवाय कसे?

दुबईतील युनिव्हर्सिटीज जसे की University of Dubai, Heriot-Watt Dubai, Middlesex University Dubai या IELTS ऐवजी तुमची इंग्रजीची मुलाखत घेतात किंवा Duolingo नावाची सोपी टेस्ट घेतात जी घरबसल्या 2000 रुपयात होते.

खर्च किती येतो ?

  • बॅचलर डिग्री - वर्षाला 6 ते 9 लाख रुपये
  • मास्टर डिग्री - वर्षाला 8 ते 12 लाख रुपये
  • हा खर्च UK, USA च्या तुलनेत अर्धा आहे. राहण्यासाठी शेअरिंग घेतले तर महिन्याला 35 ते 40 हजारात राहणे होते.
  • दुबईत शिकण्याचा फायदा म्हणजे शिकताना फुल टाईम जॉब करण्याची परवानगी आहे आणि शिक्षणानंतर 2 वर्षांचा वर्क व्हिसा मिळतो.
  • स्कॉलरशिप कशी मिळवायची, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट
  • 90 टक्के विद्यार्थ्यांना वाटते स्कॉलरशिप फक्त हुशार लोकांना मिळते, हे चुकीचे आहे.

1. DAAD स्कॉलरशिप जर्मनी - ही जगातील सर्वात मोठी स्कॉलरशिप आहे. मास्टर करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याला 934 युरो स्कॉलरशिप, विमान तिकीट आणि इन्शुरन्स मोफत मिळतो. 12 वी मध्ये 75 टक्के पेक्षा जास्त असतील तरी तुम्ही अर्ज करू शकता.

2. Erasmus Mundus स्कॉलरशिप - युरोपमध्ये शिकण्यासाठी, पूर्ण शिक्षण मोफत प्लस महिन्याला 1400 युरो. यात तुम्ही 2 देशात शिकू शकता.

3. दुबईतील युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप - दुबईतील सर्व युनिव्हर्सिटीज 30 ते 50 टक्के स्कॉलरशिप देतात जर तुमचे 12 वी किंवा ग्रॅज्युएशनमध्ये 65 टक्के पेक्षा जास्त असतील. तुम्हाला फक्त 10 वी, 12 वीचे मार्कशीट आणि SOP म्हणजे Statement of Purpose लागते.

अर्ज कसा करावा?

स्टेप 1 - तुमचे पासपोर्ट तयार ठेवा

स्टेप 2 - 10 वी, 12 वी, डिग्रीचे मार्कशीट इंग्रजीत ट्रान्सलेट करा

स्टेप 3 - MOI सर्टिफिकेट कॉलेजमधून घ्या

स्टेप 4 - युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर थेट अर्ज करा, एजंटची गरज नाही

स्टेप 5 - ऑफर लेटर आल्यावर ब्लॉक अकाउंट किंवा बँक स्टेटमेंट दाखवून व्हिसा घ्या

एक महत्त्वाचा सल्ला, परदेशात जायचे असेल तर कोणत्याही एजंटला 1 ते 2 लाख रुपये देऊ नका. सर्व अर्ज तुम्ही स्वतः करू शकता. फक्त युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घ्या.

माहिती  स्रोत - इंटरनेट