Hunger strike over NEET exam paper leak : सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली: हायकोर्टाची केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस: बुधवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश - टॉप न्यूज मराठी

दिल्ली : सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे नीट परीक्षा पेपर फुटी विरोधात उपोषण सुरूच आहे. या उपोषणाला आता 17 दिवस उलटून गेले आहेत. दरम्यान सोनम वांगचूक यांची प्रकृती आता मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. त्यामुळे हायकोर्टाने आता केंद्र आणि दिल्ली सरकारला फटकारले असून बुधवार पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

नीट परीक्षा पेपर फुटी विरोधात सोनम वांगचुक यांनी गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. 17 दिवसांनंतर आता वांगचूक यांची प्रकृती मोठ्या प्रमाणावर खालवली आहे. 28 जून पासून ते दिल्लीतील जंतर मंतर येथे बेमुदत उपोषणावर बसले आहेत.शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणांची मागणी त्यांनी केली असून पेपर फुटी मुळे प्रभावित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी हे उपोषण त्यांनी सुरू केले आहे. 

दरम्यान 17 दिवसानंतर सोनम वांगचुक यांचे वजन तब्बल 8.5 किलो घटले असून रक्तदाब देखील 109/70 घसरला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर मोठा परिणाम झाला असल्याकारणाने दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये वांगचुक यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू करावेत तसेच त्यांना फोर्स फीडिंग द्रव आहार, जीवनसत्वे, आणि इतर पोषक तत्वे देण्यात यावीत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी आता हायकोर्टाने गंभीर दखल घेऊन केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला बुधवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.