जर तुमच्या गाडीची नोंदणी 1 एप्रिल 2019 पूर्वीची असेल आणि तुम्ही अजूनही HSRP म्हणजेच High Security Registration Plate बसवली नसेल, तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
महाराष्ट्र सरकारने HSRP बसवण्यासाठी शेवटची तारीख 30 जून 2026 दिली होती. ही तारीख संपली आहे. 1 जुलै 2026 पासून राज्यभरात कडक कारवाई सुरू झाली आहे.
1. 1000 रुपयांचा दंड - प्रत्येक वेळी तुम्ही चेक नाक्यावर किंवा टोलवर पकडले गेलात, तेव्हा 1000 रुपयांचा दंड लागेल. हा दंड Motor Vehicles Act अंतर्गत लागतो.
2. RTO ची 6 कामे बंद - HSRP नसेल तर तुमच्या गाडीचे Ownership Transfer, पत्ता बदलणे, Hypothecation लावणे/काढणे, Re-registration, गाडीत बदल करणे, Permit Renewal ही कामे होणार नाहीत.
फक्त 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या गाड्यांना. त्यानंतरच्या गाड्यांना शोरूममधूनच HSRP लावून मिळते.
- दुचाकी - 450 रुपये
- तीनचाकी - 500 रुपये
- चारचाकी - 745 रुपये + GST
जर तुम्ही 30 जून 2026 पूर्वी अधिकृत वेबसाईटवरून Appointment बुक केली असेल, तर तुम्हाला दंड लागणार नाही, जरी तुमची प्लेट बसवायची बाकी असली तरी. त्यामुळे Appointment ची पावती गाडीत ठेवा.
फक्त परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करा. कोणत्याही एजंटच्या नादी लागू नका. तिथे गाडीचा नंबर, चेसिस नंबर टाकून जवळचे Fitment सेंटर निवडता येते.