अनेकदा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 'हाऊस रेंट अलाउन्स' म्हणजेच HRA चा समावेश नसतो. तसेच स्वयंरोजगार (Self-employed) करणाऱ्या व्यक्तींना तर असा कोणताही भत्ता मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा परिस्थितीत भाड्याच्या घरात राहूनही टॅक्स सूट कशी मिळवायची, असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु, आता काळजी करण्याची गरज नाही. आयकर कायद्यात अशा नागरिकांसाठी एक विशेष तरतूद करण्यात आली आहे.
आयकर कायद्याच्या कलम 80GG (Section 80GG) अंतर्गत, जर तुम्हाला कंपनीकडून HRA मिळत नसेल, तरीही तुम्ही भाड्याच्या घरावरील करात मोठी सवलत मिळवू शकता. या कलमांतर्गत पगारदार कर्मचारी आणि व्यावसायिक जुन्या कर प्रणालीत (Old Tax Regime) वार्षिक ६०,००० रुपयांपर्यंतची (दरमहा ५,००० रुपये) वजावट सहज क्लेम करू शकतात.
करात सवलत मिळवण्यासाठी 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील:
कलम 80GG चा लाभ घेण्यासाठी करदात्यांनी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ते म्हणजे
संबंधित आर्थिक वर्षात तुम्हाला कोणत्याही प्रकारे कंपनीकडून HRA मिळालेला नसावा.
स्वतःचे घर नसावे: तुम्ही ज्या शहरात नोकरी किंवा व्यवसाय करता, तिथे तुमच्या स्वतःच्या, जोडीदाराच्या (Husband/Wife) किंवा अल्पवयीन मुलाच्या नावावर कोणतेही निवासस्थान नसावे. जर तुमचे दुसऱ्या एखाद्या शहरात स्वतःचे घर असेल, तर त्यावर तुम्ही स्वतः राहत असल्याचे (Self-occupied) दाखवून इतर कोणताही टॅक्स बेनिफिट घेतलेला नसावा.
टॅक्स वजावटीची गणना कशी होते?
या कलमांतर्गत मिळणारी सूट खालील तीन घटकांवर अवलंबून असते. यापैकी जी रक्कम सर्वात कमी असेल, तितकीच टॅक्स सूट तुम्हाला मिळते:
लाभ कसा घ्यावा? (आवश्यक कागदपत्रे)
त्यामुळे जर तुमच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये HRA नसेल, तर आयटीआर भरताना कलम 80GG चा वापर करून आपल्या कष्टाचा पैसा नक्की वाचवा.