बुधवार दिनांक 15 जुलै 2012, तिथी आषाढ शुक्ल प्रतिपदा, नक्षत्र रात्री नऊ सत्तेचाळीस पर्यंत पुष्य नक्षत्र असून त्यानंतर आश्लेषा नक्षत्र ,आज रास कर्क, आजपासून आषाढ मास सुरू होत असून दिवसात सर्वांनीच महत्त्वाची त्याचबरोबर न्यायालयीन निर्णय घेऊ नये. थोडं जपा बाकी दिवस चांगला आहे.
मेष रास
आजचा दिवस मेष राशीसाठी हलकाफुलका आहे. कार्यालयीन आणि कौटुंबिक जीवन स्थिर आहे. त्यामुळे आज तुम्ही निवांत असाल. पण वेळेचे नियोजन नीट करा. गृह सजावटीसाठी खरेदी कराल.
वृषभ रास
आज वृषभ राशीसाठी दिवस थोडा व्यस्त असेल. नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी थोडी धावपळ होईल. कामाचा आणि अभ्यासाचा ताण येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाचं सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे दिवस छान जाईल.
मिथुन रास
आज वाणीवर नियंत्रण ठेवा. अर्थात आज तुम्ही जे बोलाल त्यावर तथास्तु म्हटले जाणार आहे. गोड बोला, स्वतःसाठी चांगलं बोला. कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळू शकते. विद्यार्थ्यांना दिवस चांगला.
कर्क रास
कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. कार्यालय आणि कौटुंब सुसंवादाने भरलेली असेल. त्यामुळे मन खुश आहे. आज नवीन काम मिळू शकेल. अति भावनिक होऊन विचार करू नका.
सिंह रास
सिंह राशीसाठी आजचा दिवस थोडा आव्हानांनी भरलेला आहे. महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. मन स्थिर ठेवून काम करा. सूडबुद्धीने कोणत्याही कार्याला वळण देऊ नका. मौन धारण करणे आज साठी उत्तम.
कन्या रास
कन्या राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा आहे. आज तुमची चिकित्सक वृत्ती तुमच्या व्यक्तिमत्त्वात वेगळी ओळख निर्माण करेल. कार्यक्षेत्रात वाहवाही मिळेल, दबदबा राहील पण खर्चावर नियंत्रण ठेवा.
तूळ रास
आज अनेक वर्षांपासून तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे तुम्हाला फळ मिळणार आहे. कार्यक्षेत्रातच नाही तर कुटुंबात देखील सर्वांना तुमचं महत्त्व कळेल. फार बोलण्याची आज गरज नाही तुमचं काम आणि कर्म योग्य फळ देईल.
वृश्चिक रास
वृश्चिक रास अनेक दिवसांपासून मन अशांत असल्याने त्रासात आहे. पण आता तुम्ही योग्य मार्गावर आहात. राहूच्या दृष्टीमुळे अनेक चुकीचे निर्णय घेतले जात होते. पण आता भाग्याची साथ मिळणार आहे. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा मूड होईल.
धनु रास
धनु राशीसाठी आजचा दिवस आर्थिक विवंचनेतून थोडंसं रिलॅक्स होण्याचा आहे. जुने येणारे पैसे आज मिळतील. कोणाला कर्ज दिले असेल तर आज स्वतःहून ते पैसे परत मिळतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील एखाद शुभकार्य ठरेल.
मकर रास
मकर राशीसाठी आज हुश्श.. म्हणण्याचा दिवस आहे. शनी महाराज आज तुम्हाला थोडा निवांत वेळ मिळवून देणार आहेत. कोणतीही परीक्षा नाही. त्यामुळे चांगले कर्म करा ,कामात प्रामाणिक राहा. यश तुमचेच आहे. दिवस मनशांतीचा !
कुंभ रास
आज वाणीवर फक्त नियंत्रण ठेवा. मन कसे शांत ठेवता येईल याचा अभ्यास करा. ग्रहमानानुसार गैरसमज त्यातून निर्माण होणारे वाद तसे अजूनही आहेत. त्यामुळे कोणाला लगेच तडकाफडकी उलट बोलू नका. विद्यार्थ्यांसाठी दिवस नवीन काहीतरी शिकण्यासाठी छान आहे.
मीन रास
आरोग्याच्या थोड्या तक्रारी जाणवतील. पण अगदीच दुर्लक्ष करू नका. वेदनेने मन कलुषित होईल. कोणाशी वादही घालू नका. आजचा आला दिवस ढकलून द्या. वाचन करा ,पिक्चर पहा. आज जे आवडतं ते स्वतःला खुश करण्यासाठी करा. गृहिणींनो आज चटका बसू शकतो .थोडी काळजी घ्या !