HOROSCOP : मकर रास आज जोडीदारासोबत नातं ताजतवानं होणार ! वृश्चिक घेणार पर्यटनाचा आनंद; वाचा तुमचे राशी भविष्य - टॉप न्यूज मराठी

आज गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 आषाढ शुक्ल द्वितीया नक्षत्र सायंकाळी 7:52 वाजेपर्यंत आश्लेषा त्यानंतर मघा. रास सायंकाळी 7:५२ पर्यंत कर्क त्यानंतर सिंह राहुकाळ १:३० ते ३ वाजेपर्यंत 

मेष रास 

मेष राशीच्या जातकांसाठी जे आज नोकरीच्या शोधात आहेत त्यांना संधी चालून येणार आहे. शासकीय कामे आज होऊ शकणार नाहीत. फार धडपड करू नका. कार्यक्षेत्रात आज तुमच्या मताला फार महत्त्व मिळणार नाही. मनाला लावून घेऊ नका. 

वृषभ रास 

वृषभ राशीसाठी आज आर्थिक मोठा फायदा मिळणार आहे. तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर मोठा फायदा मिळेल. पण अति आत्मविश्वास देखील नको कुटुंबियांसोबत आनंदी वेळ घालवाल. पर्यटनाला जाण्याचा देत असू शकाल. 

मिथुन रास 

मिथुन राशीसाठी आज चांगला दिवस आहे. रखडलेली काम पूर्ण होणार आहेत. या वीकेंडला जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा नियोजन करा. पंचपकवानांचा आस्वाद घ्याल. 

कर्क रास 

कार्यालयीन कामकाजात सहका-र्यांचे चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे काम लवकर संपतील. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवा. न्यायालयीन किंवा वडिलोपार्जित संपत्ती बाबत रखडलेली काम पूर्ण होतील. पण राहू काळ टाळा. 

सिंह रास 

सिंह राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. आज नोकरदार वर्ग सुट्टी घेऊन घरच्या सोबत वेळ घालण्याचं नियोजन करू शकतात. घराबाहेर पडण्यापेक्षा घरातच राहून आराम करा. मनावरचा ताण कमी होईल. 

कन्या रास 

कन्या राशीसाठी विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. काहीतरी नवीन शिकण्यासाठी सरसावाल भविष्याचे चांगले नियोजन करा. परंतु डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून संभाषण करा. एखादा वाईट शब्द तुमच्या झालेलं काम फिस्कटवू शकतील. 

तुळ रास 

तूळ राशीसाठी आजचा दिवस हलकाफुलका आहे. कार्यालयात आणि कुटुंबात वातावरण शांत आहे. त्यामुळे तुम्हाला मनशांती मिळणार आहे. आज थोडा मानसिक आराम करा. 

वृश्चिक रास

वृश्चिक राशीसाठी सर्वच ग्रह पंचकवांनांचे ताट घेऊन तयार आहे. म्हणून आज आनंद असणार आहे. आर्थिक आवक चांगली आहे. मोकळ्या वेळेत जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. चांगल्या दिवसांचा आनंद घ्या. 

धनु रास

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. परंतु तुम्हाला महत्त्वाचे काम पुढे ढकलावी लागतील. संबंधित लोकांचे चांगले सल्ले घ्या. विद्यार्थ्यांसाठी दिवस प्रगतीचा आहे. गृहिणींना आज थोडा आराम करा. तब्येतीची काळजी घ्या. 

मकर रास 

मकर राशिसाठी आजचा दिवस जोडीदारासोबत नातं ताजतवाण करणारा आहे. सगळी काम, इगो बाजूला ठेवा आणि सुंदर ठिकाणी पर्यटनाचा जोडीदारासोबत आनंद घ्या.  आज फक्त नात्यावर फोकस करा. बाकी सर्व काही आनंदी आनंद !

कुंभ रास 

कुंभ राशीने आज दगदग कमी करावी. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. उपासतापास टाळा. जे काही काम करत आहात त्यामध्ये थोडी गुप्तता राखा. सोन्याचे दिवस येणार आहेत.  

मीन रास 

मीन राशीसाठी आज थोडा अजब दिवस असणार आहे. काहीतरी अशी घटना, गोष्ट जी तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुमच्यापासून अनेक दिवसांपासून लपवली होती. ती आज उघडकीस येणार आहे. मन खंबीर ठेवा, माणूस समजून घ्या. थोडंसं मन खट्टू होणार आहे पण दिवस ढकलून न्या !