गार पाणी पिण्याची सवय सगळ्यांनाच आहे, पण आयुर्वेदापासून ते डॉक्टरांपर्यंत सगळे सकाळी कोमट पाणी प्यायला सांगतात. कारण गार पाणी शरीराचं इंजिन संथ करत, तर कोमट पाणी आतून साफ करतं. पाहूया नेमके काय फायदे होतात.
1.आजच सुरु करा! रोज सकाळी 1 ग्लास कोमट पाणी प्या - शरीराला मिळतील जबरदस्त फायदे
सकाळी उपाशीपोटी 1-2 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने आतड्यांना हालचाल मिळते. गरम पाण्यामुळे आत अडकलेलं मल मऊ होऊन बाहेर पडायला मदत होते. त्यामुळे पोट फुगणं, गॅस आणि संडासला त्रास ही समस्या हळूहळू कमी होते.
2. छातीत अडकलेला कफ आणि घसा दुखणं कमी होतं
पावसाळ्यात किंवा सर्दी झाली की घसा बसतो आणि कफ चिकटतो. कोमट पाणी प्यायल्याने घशाला आराम मिळतो आणि कफ पातळ होऊन सहज बाहेर पडतो. त्यामुळे खोकला आणि घसादुखीवर कोमट पाणी म्हणजे घरगुती रामबाण उपाय आहे.
3. पचनक्रिया सुधारते आणि भूक व्यवस्थित लागते
जेवणानंतर गार पाणी प्यायल्याने अन्नातील तेल गोठतं आणि पचन बिघडतं. पण कोमट पाणी अन्न पचवणाऱ्या एन्झाईम्सना अॅक्टिव्ह करतं. त्यामुळे जेवण लवकर पचतं, पोट हलकं राहतं आणि भूकही वेळेवर लागते.
4. वजन कमी करायला मदत होते
कोमट पाणी शरीराचं तापमान थोडं वाढवतं ज्याला "मेटाबॉलिझम" म्हणतात. मेटाबॉलिझम फास्ट झाल्याने कॅलरी लवकर बर्न होतात. शिवाय कोमट पाण्याने पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं.
5. शरीरातील घाण आणि विषारी घटक बाहेर पडतात
कोमट पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. यालाच आतून "डिटॉक्स" होणं म्हणतात. त्यामुळे आळस, थकवा आणि डोकेदुखीचा त्रास कमी होतो.
6. सर्दी, ताप लवकर बरा होतो
सर्दी झाली की नाक बंद होतं आणि अंग दुखतं. अशावेळी दिवसातून 3-4 वेळा कोमट पाणी प्यायल्याने शरीराला आतून उब मिळते, नाक मोकळं होतं आणि ताप लवकर उतरतो.
7. त्वचा लवचिक होते आणि सुरकुत्या कमी होतात
शरीरात पाण्याची कमतरता झाली की त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते. कोमट पाणी रक्ताभिसरण सुधारतं त्यामुळे त्वचेला आतून पोषण मिळतं. याने त्वचा टवटवीत दिसते आणि वयापूर्वी येणाऱ्या सुरकुत्या लांबतात.
8. केस लवकर पांढरे होत नाहीत आणि गळती कमी होते
केसांच्या मुळांपर्यंत रक्त नीट पोहोचत नसेल तर केस लवकर पांढरे होतात आणि गळतात. कोमट पाणी रक्तप्रवाह सुरळीत करतं त्यामुळे केसांना पोषक तत्व मिळतात आणि ते मजबूत राहतात.
सगळ्यात महत्वाचं: कोमट म्हणजे चहा एवढं गरम नाही. फक्त बोट बुडवल्यावर सहन होईल इतकं कोमट हवं. सकाळी उठल्यावर आणि जेवणानंतर 30 मिनिटांनी प्या.
दिवसाची सुरुवातच 1 ग्लास कोमट पाण्याने करा, 15 दिवसात फरक स्वतःला जाणवेल