Health Tips : पावसाळा आता खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे . जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली तरी महाराष्ट्रात आता पावसाने चांगलाच जोर धरलाय. पावसाळ्याच्या दिवसात मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पावसाळा हा संसर्गजन्य आजारांसाठी, विशेषतः सर्दी, खोकला आणि डोळ्यांचे संसर्ग यांसाठी संवेदनशील असतो. त्यामुळे पालकांनी काही सोप्या टिप्स अवलंबल्या तर घरात आरोग्य टिकून राहील.
मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काही सोप्या सवयी आणि टिप्स
१. मुलांना नियमितपणे हात धुण्याचे सवयी लावा.
२. संतुलित आहार द्या, ज्यात फळं आणि भाज्या यांचा समावेश असेल.
३. पुरेशी झोप आणि आराम याची काळजी घ्या.
४. पाणी उकलूंन आणि गाळूनच प्यावे.भरपूर पाणी पिणे देखील आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे.
५. बाहेरच्या खेळांपेक्षा घरात सुरक्षित असं खेळण्यावर भर द्या.
६. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं देऊ नका.
७. शाळेत किंवा बाहेर जाताना मुलांना नेहमी एक एक्स्ट्रा कोरडे कपडे सोबत ठेवावेत, कारण पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलणे आवश्यक आहे.
८. पाण्यात भिजल्यावर लगेच कपडे बदलून, मुलांना थंडी लागण्याची शक्यता कमी करा.ओले कपडे अंगावर अधिक काळ ठेवल्यास फंगल इन्फेक्शनची भीती राहते.
९. पावसाळ्यात मुलांना गरम, पोषक आहार द्या, जसे खिचडी, दाल, सूप, उकडलेल्या भाज्या.बाहेरचे अन्नपदार्थ प्रकर्षाने टाळावेत.
१०. फ्रूट्स जसे सफरचंद, मोसंबी, केळी यांचा आहारात समावेश करा.
११. तळलेले, बाहेरचे पदार्थ टाळा, कारण ते पचनास त्रासदायक ठरू शकतात.
या सोप्या गोष्टींमुळे मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत राहते, आणि पावसाळा आनंदाने आणि सुरक्षिततेने घालवता येतो.