HEALTH TIPS : कडू कारले निसर्गाचे बहुगुणी वरदान ! - टॉप न्यूज मराठी

HEALTH TIPS :  हिरव्या पालेभाज्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असणे जेव्हडे गरजेचे आहे तेवढेच कारले Bitter Gourd देखील आवश्यक आहे. अगदी रोजच्या आहारात वेगवेळ्या पद्धतीने जर कारल्याचे सेवन करता आले तर त्याचा शरीराला खूप चांगला फायदा मिळू शकतो. कारल्याची चव जरी कडू असली, तरी त्याचे आपल्या आरोग्यासाठी असणारे फायदे अत्यंत गोड आहेत. जाणून घेऊया कारल्याचे प्रमुख आयुर्वेदिक उपयोग कोणते आहेत. 

प्रमुख आरोग्य फायदे :

१. रक्तातील साखर नियंत्रण:

एकूण रक्तातील साखरेची पातळी  नियंत्रित ठेवण्यास मोठी मदत करते. डायबेटिज असलेल्यांसाठी हे उत्तम आहे.

२. उत्तम पचनक्रिया:

पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्टतेचा त्रास दूर करण्यास मदत करते.

३. रक्त शुद्धीकरण :

शरीरातील रक्त शुद्ध करते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि स्वच्छ राहते.

४. वजन नियंत्रण आणि प्रतिकारशक्ती :

वजन कमी करण्यास आणि शरीराचे चयापचय  सुधारण्यास मदत करते.

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती  वाढवते.

वापरण्याच्या पद्धती :

कारल्याचा रस : सकाळी उपाशी पोटी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर.

कारल्याची भाजी : आहारात नियमित समावेश कराव 

कारल्याची पूड : कोमट पाण्यासोबत सेवन करू शकता.