HEALTH IS WEALTH : सतत थकवा येतो ? चक्कर येते, हात-पाय मुंग्या येतात, B12 ची कमतरता असेल, रोज खा हे 4 पदार्थ - टॉप न्यूज मराठी

आजकाल 25 ते 40 वयोगटातील अनेक तरुणांमध्ये एकच तक्रार दिसते - सकाळी उठल्यापासून थकवा जाणवतो, थोडे चालले की दम लागतो, चक्कर येते, हात पायाला मुंग्या येतात. अनेकजण याला कामाचा ताण समजतात पण डॉक्टर सांगतात यामागे व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते.

B12 आपल्या शरीरातील रक्त तयार करण्यासाठी आणि नसा मजबूत ठेवण्यासाठी खूप गरजेचे असते. हे व्हिटॅमिन शरीर स्वतः बनवत नाही, ते आपल्याला आहारातून घ्यावे लागते. शाकाहारी लोकांमध्ये याची कमतरता जास्त दिसते.

B12 च्या कमतरतेची लक्षणे कोणती ?

  • विनाकारण थकवा आणि अशक्तपणा
  • हात-पाय बधीर होणे किंवा मुंग्या येणे
  • चक्कर येणे, लक्षात न राहणे
  • जीभेवर फोड येणे आणि तोंड येणे

जर अशी लक्षणे असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण आहारात हे 4 पदार्थ नक्की समाविष्ट करा.

1. दूध, दही आणि पनीर 

रोज सकाळी एक ग्लास दूध आणि दुपारी एक वाटी दही खाल्ल्याने B12 ची गरज बऱ्यापैकी पूर्ण होते. पनीर हा सुद्धा उत्तम स्रोत आहे.

2. अंडी 

तुम्ही अंडी खात असाल तर उकडलेले अंडे हा B12 चा सर्वात स्वस्त आणि चांगला उपाय आहे. अंड्यातील पिवळ्या भागात B12 जास्त असते.

3. मशरूम आणि सोयाबीन 

शाकाहारी लोकांसाठी मशरूम हा वरदान आहे. आठवड्यातून 2 वेळा मशरूमची भाजी खा. सोयाबीन आणि फोर्टिफाइड सोया मिल्कमधूनही B12 मिळते.

4. अंकुरलेले कडधान्य आणि ड्रायफ्रुट्स 

मोड आलेले मूग, हरभरे आणि बदाम, अक्रोड यामध्येही थोड्या प्रमाणात B12 असते. हे रोजच्या नाश्त्यात घ्या.

लक्षात ठेवा, फक्त आहार नाही तर उन्हात थोडा वेळ बसणे आणि वेळेवर झोपणे सुद्धा गरजेचे आहे. लक्षणे जास्त असतील तर स्वतःहून गोळ्या घेऊ नका, रक्त तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या.