HEALTH IS WEALTH : आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला कंबरदुखीचा त्रास आहे. दिवसभर लॅपटॉपसमोर बसणे, मोबाईल पाहणे आणि चुकीच्या पद्धतीने बसल्याने कंबरेचे दुखणे अगदी तरुण वयातही सुरू झाले आहे. जीमला जाण्यासाठी वेळ नाही आणि औषधांचा कंटाळा आला असेल तर जपानचे एक छोटे तंत्र तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते.
जपानमध्ये याला मेथड ऑफ करेक्ट पोश्चर असे म्हणतात. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, फक्त घरातील खुर्ची पुरेशी आहे.
एक टॉवेल घ्या आणि त्याची घट्ट गुंडाळी करा. आता खुर्चीवर अगदी सरळ बसा. पाठीचा कणा टेकवू नका. बनवलेली टॉवेलची गुंडाळी आपल्या पाठीमागे, कंबरेच्या बरोबर मागे ठेवा. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा, डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. 5 मिनिटे याच स्थितीत बसा.
जेव्हा आपण ही गुंडाळी पाठीमागे ठेवतो तेव्हा आपला मणका त्याच्या नैसर्गिक आकारात येतो. 5 मिनिटातच कंबरेभोवतीचा रक्तप्रवाह सुधारतो, नसांवरील दाब कमी होतो आणि दुखणे हळूहळू कमी होते. जपानी डॉक्टर सांगतात की हे रोज केल्याने पोट पुढे येणेही थांबते आणि बसण्याची सवय सुधारते.
दिवसातून फक्त दोन वेळा, सकाळी आणि संध्याकाळी 5 मिनिटे करा. कोणतेही औषध नाही, कोणताही खर्च नाही.