भारतात 90% लोकांचा दिवस चहाने सुरू होतो. अंथरुणातून उठल्या उठल्या गरमागरम चहा मिळाला नाही तर दिवसच सुरु होत नाही, अशी अनेकांची सवय आहे. पण हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी विष ठरू शकते, असे डॉक्टर सांगतात.
तुम्हीही रिकाम्या पोटी चहा पीत असाल तर आजपासूनच ही सवय बदला. यामुळे काय नुकसान होते, ते जाणून घेऊयात.
1) अॅसिडिटी आणि पोटात जळजळ:
चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन नावाचे घटक असतात. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात अॅसिडचे प्रमाण अचानक वाढते. पचवायला अन्न नसल्याने हे अॅसिड पोटाच्या आतल्या आवरणाला इजा पोहोचवते. त्यामुळे छातीत जळजळ, मळमळ, गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्या सुरू होतात. रोज असं झालं तर गॅस्ट्रायटिस किंवा अल्सर सुद्धा होऊ शकतो.
2) शरीरात पाणी कमी होते:
रात्रभर झोपल्यामुळे शरीर आधीच डिहायड्रेट झालेले असते. त्यात चहा हा पित्त वाढवणारा पदार्थ आहे. सकाळी उठल्यावर लगेच चहा प्यायल्याने शरीरातील पाणी आणखी कमी होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो.
3) लोहाची कमतरता होते
चहामधील टॅनिन हे शरीरातील लोह शोषून घेण्यास अडथळा आणते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अशक्तपणा, केस गळणे, थकवा यासारख्या समस्या येतात. एका रिसर्चनुसार जेवणासोबत चहा प्यायल्याने 39% लोह कमी शोषले जाते.
मग काय करावे?
उठल्यावर सगळ्यात आधी 1 ग्लास कोमट पाणी प्या. त्यानंतर काहीतरी हलके खा आणि मग चहा प्या.
चहाआधी काय खावे?
1) 4-5 भिजवलेले बदाम, काजू, मनुके
2) फळ, उकडलेली अंडी किंवा हलका नाश्ता
3) फुटाणे किंवा रात्री भिजवलेले स्प्राउट्स
आणि चहा प्यायची योग्य वेळ म्हणजे सकाळी 10 नंतर किंवा नाश्ता झाल्यावर. चहा जास्त गरम (65 डिग्रीपेक्षा जास्त) पिऊ नका, त्याने अन्ननलिकेचा कॅन्सरचा धोका वाढतो, असं डॉक्टर सांगतात.