HEALTH IS WEALTH : सकाळी उठल्यावर तोंड कडू होणे, छातीत जळजळ होणे, डोके दुखणे, मळमळ होणे हा सगळा पित्ताचा त्रास आहे. आजकाल 10 पैकी 7 लोकांना पित्ताचा त्रास आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे पित्त वाढते. पित्त नेमके कशामुळे होते आणि ते घरच्या घरी कसे कमी करायचे याची संपूर्ण माहिती पाहूया.
1. चुकीचा आहार:
आपण रोज तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, फास्ट फूड, बेकरीचे पदार्थ, लाल मांस खातो. हे पदार्थ पचायला जड असतात. सतत असे अन्न खाल्ल्याने पोटात ऍसिड जास्त तयार होते आणि छातीत जळजळ सुरू होते.
2. अपेय पान - चहा, कॉफी, दारू:
आयुर्वेदात चहा, कॉफी, दारू, सिगारेट यांना अपेय पान म्हटले आहे. म्हणजे पिऊ नये असे पदार्थ. दिवसातून 4-5 वेळा चहा-कॉफी प्यायल्याने पोटातील उष्णता प्रचंड वाढते आणि पित्त हमखास वाढते. रिकाम्या पोटी चहा पिणे हे पित्ताचे सर्वात मोठे कारण आहे.
3. ऊन सहन न होणे:
कडक उन्हात सतत काम करणे, उन्हातून आल्या आल्या थंड पाणी पिणे यामुळे शरीरातील पित्त दोष वाढतो. शरीरात उष्णता वाढली की पित्त वाढतेच.
4. भावनिक ताण-तणाव:
जास्त विचार करणे, राग, चिंता, रात्री उशिरा झोपणे यामुळे सुद्धा पित्त वाढते. मनाचा आणि पोटाचा थेट संबंध असतो.
1. अमृत फळ आवळा:
आवळा हा पित्तावरचे अमृत आहे. आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन C असते जे पोट स्वच्छ ठेवते. रोज सकाळी एक कच्चा आवळा थोडे सैंधव मीठ लावून खा. किंवा आवळा पावडर कोमट पाण्यातून घ्या. 8 दिवसात पित्त गायब होईल.
2. मूग आणि तांदूळ - पित्तावर हलका आहार:
पित्त झाल्यावर काय खावे कळत नाही. अशावेळी मूगाचे साधे वरण, मऊ भात आणि त्यावर एक चमचा तूप हा सर्वोत्तम आहार आहे. मूग हा पित्तशामक आहे. 2-3 दिवस तिखट बंद करून हाच आहार घ्या, पोटाला आराम मिळेल.
3. आले आणि लिंबू सरबत:
आले गरम आहे असे वाटते पण ते पित्त कमी करते. आल्याचा छोटा तुकडा किसून त्यात लिंबाचा रस, थोडे मीठ आणि थोडी साखर टाका. हे मिश्रण चमच्याने थोडे-थोडे प्या. याने पचन सुधारते आणि मळमळ थांबते.
4. कोकम सरबत:
प्रत्येक घरात आमसूल म्हणजेच कोकम असते. कोकम हे नैसर्गिकरित्या थंड असते. कोकमचे सरबत करून प्यायल्याने छातीतील आणि पोटातील जळजळ लगेच थांबते. पित्तावरचा हा सगळ्यात स्वस्त आणि गुणकारी उपाय आहे.
5. थंड दूध:
पित्तामुळे छातीत आग होत असेल तर लगेच थोडे थंड दूध त्यात थोडी साखर टाकून प्या. दूध हे नैसर्गिक अँटासिड आहे. ते ऍसिडला शांत करते.
6. पिकलेले केळे:
केळ्यात पोटॅशियम आणि फायबर भरपूर असते. रोज एक पिकलेले केळे खाल्ल्याने पोटातील ऍसिड तयार होण्याची प्रक्रिया मंदावते आणि पचन वेगवान होते.
हे उपाय करूनही जर तुम्हाला रोजच पित्ताचा त्रास होत असेल, उलटी येत असेल तर दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
महत्वाचे : वरील माहिती ही सामान्य ज्ञान आणि घरगुती उपायांवर आधारित आहे. हा कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा त्रास जाणवल्यास जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.