HEALTH IS WEALTH : घरात बसूनच चेक करा फिटनेस ! 'या' 4 सोप्या टेस्ट पास केल्यास तुम्ही 100% हेल्दी आहात - टॉप न्यूज मराठी

निरोगी आणि दीर्घायुषी आयुष्य जगण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. पण आपण आतून खरंच फिट आहोत का हे कसे ओळखायचे? जिम, डायट आणि महागड्या टेस्टशिवायही काही सोप्या फिजिकल टेस्ट्स आहेत ज्यातून तुमच्या शरीर आणि मेंदूच्या हेल्थचा अंदाज येतो. एक्सपर्ट्सनुसार जर तुम्ही या 4 गोष्टी सहज करू शकत असाल तर समजून जा तुम्ही पूर्णपणे फिट आहात.

1. एका पायावर 60 सेकंद बॅलन्स

हे लहान मुलांचं काम वाटतं पण याचा थेट संबंध तुमच्या मेंदूशी आहे. 

कसं करायच : दोन्ही हात बाजूला करून एका पायावर उभे राहा. 

रिझल्ट : जर तुम्ही 60 सेकंद बॅलन्स करू शकलात तर तुमचा मेंदू आणि नर्व्हस सिस्टीम हेल्दी आहे. _ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसीन_ च्या रिपोर्टनुसार, 10 सेकंदही बॅलन्स न करू शकणाऱ्या वयस्कांना पुढील 10 वर्षांत मृत्यूचा धोका जास्त असतो. 20 सेकंदही टिकू शकत नसाल तर सावध व्हा.

2. चेअर टेस्ट - 20 सेकंदात 10 वेळा उठ-बस

यासाठी हात नसलेली खुर्ची घ्या.

कसं करायचं : 20 सेकंदात किती वेळा खुर्चीवरून उठून बसू शकता ते मोजा.

रिझल्ट : UK मधील स्टडी सांगते की, जे लोक 20 सेकंदात 10 वेळा करू शकतात त्यांचे हृदय, फुफ्फुसे आणि पायांचे स्नायू मजबूत असतात. याचा अर्थ तुमचं आयुष्य जास्त आणि निरोगी असू शकतं.

3. पायाच्या बोटांना स्पर्श करा

कसं करायचं : जमिनीवर पाय सरळ करून बसा. आता न वाकता हातांनी पायांच्या अंगठ्यांना टच करा.

रिझल्ट : जर तुम्ही सहज टच करू शकत असाल तर तुमचं शरीर आणि रक्तवाहिन्या लवचिक आहेत. तज्ञ सांगतात, "Flexible Body = Flexible Arteries". शरीर कडक असेल तर हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

4. न थांबता पायऱ्या चढा

कसं करायचं : 3-4 मजल्यांच्या पायऱ्या एका दमात चढून बघा.

रिझल्ट : स्पेनमधील हॉस्पिटलच्या रिसर्चनुसार, ज्या लोकांना पायऱ्या चढताना दम लागतो त्यांचा अकाली मृत्यू आणि कॅन्सरचा धोका जास्त असतो. पायऱ्या सहज चढल्यास तुमचं हृदय आणि फुफ्फुस टॉप कंडिशनमध्ये आहेत.

महत्वाचे !

या 4 पैकी 3 टेस्ट जरी पास केल्या तरी तुम्ही फिट आहात. पण एकाही टेस्टमध्ये अडचण येत असेल तर लाइफस्टाईलमध्ये बदल करा - रोज चालणे, स्ट्रेचिंग आणि संतुलित आहार सुरू करा. काही आजार असेल तर उगाच स्वतःवर प्रयोग करू नका, वैद्यकीय सल्लाच महत्वाचा !