आरोग्य : खजूर हे फक्त एक फळ नाही तर महिलांसाठी एक नैसर्गिक औषध मानले जाते. आयुर्वेदात खजूराला शक्तीचा खजिना म्हटले आहे. अनेक महिलांना सतत थकवा, केस गळणे, हाडे दुखणे आणि अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी रोज सकाळी फक्त 2 खजूर खाल्ल्याने शरीरात आश्चर्यकारक बदल होतात असे डॉक्टर सांगतात.
भारतात 70 टक्के महिलांमध्ये रक्ताची कमतरता म्हणजे एनिमिया आहे. त्यामुळे त्यांना सतत थकवा आणि चक्कर येते. खजूर मध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. रोज 2 खजूर खाल्ल्याने 15 दिवसात हिमोग्लोबिन वाढायला लागते. शरीरात नवीन रक्त तयार होते आणि दिवसभर उत्साह राहतो.
वयाच्या 30 नंतर महिलांच्या हाडातील कॅल्शियम कमी होऊ लागते. त्यामुळे गुडघेदुखी आणि कंबरदुखी सुरू होते. खजूर मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर असते. हे तिन्ही घटक हाडांना मजबूत करतात. रोज 2 खजूर खाल्ल्याने हाडांची झीज थांबते आणि संधिवाताचा त्रास कमी होतो.
महिलांमध्ये केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे पोषणाची कमतरता. खजूर मध्ये व्हिटॅमिन बी आणि आयर्न असल्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. त्यामुळे केस गळणे थांबते आणि नवीन केस यायला लागतात. तसेच खजूर मध्ये अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि नैसर्गिक ग्लो येतो.
अनेक महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. खजूर मध्ये फायबर जास्त असते. त्यामुळे पोट साफ होते. सकाळी रिकाम्या पोटी 2 खजूर कोमट पाण्यासोबत खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि वजन देखील नियंत्रणात राहते.
मासिक पाळीच्या वेळी महिलांना खूप त्रास होतो. मूड बदलणे, पोट दुखणे हे हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे होते. खजूर मध्ये नैसर्गिक शर्करा आणि मॅग्नेशियम असते जे हार्मोन्स संतुलित ठेवते. त्यामुळे मासिक पाळी नियमित येते आणि त्रास कमी होतो.
डॉक्टरांच्या मते सकाळी रिकाम्या पोटी 2 खजूर खाणे सर्वात फायदेशीर आहे. तुम्ही ते रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकता. दुधासोबत देखील खजूर खाणे चांगले आहे. पण एका दिवसात 2 पेक्षा जास्त खजूर खाऊ नका. जास्त खजूर खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच खजूर खावे.
ही माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.