HEALTH IS WEALTH : महागड्या औषधांशिवाय घरातील मसाल्याच्या डब्यातच आहे आरोग्याची गुरुकिल्ली, हे 17 सोपे उपाय करून पहा - टॉप न्यूज मराठी

HEALTH IS WEALTH : सर्दी खोकला, पोटदुखी, टाचांच्या भेगा यासाठी लगेच मेडिकलमध्ये जाण्याची गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या हिंग, मध, मेथी, हळद यातूनच अनेक आजारांवर आराम मिळतो. आयुर्वेदात सांगितलेले काही सोपे आणि कमी खर्चातील घरगुती उपाय जाणून घेऊया. लक्षात ठेवा हा उपायांचा लेख आहे, कोणत्याही गंभीर आजारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सविस्तर 17 घरगुती उपाय

1. उचकी थांबत नसेल तर

2-3 चमचे मध खाऊन वर कोमट पाणी प्या. दुसरा उपाय म्हणजे चिमूटभर हिंग पाण्यात मिसळून प्यायल्याने उचकीला लगेच आराम मिळतो असे आयुर्वेदात सांगितले जाते.

2. सतत ढेकर आणि मळमळ येत असेल तर

एक पिकलेले केळे कुस्करून त्यात चिमूटभर हिंग टाकून खावे. पचन सुधारते आणि मळमळ कमी होते.

3. छातीत कफ साचला असेल तर

हिंग कोमट पाण्यात कालवून त्याचा लेप छातीवर लावल्यास कफ मोकळा होण्यास मदत होते. लहान मुलांना हा उपाय करताना डॉक्टरांना विचारूनच करा.

4. टाचांच्या भेगा पाच दिवसात कमी करण्यासाठी

कोरफड गर, चिमूटभर हिंग, हळद आणि कडुनिंबाचा रस एकत्र करून पेस्ट बनवा. पाय आधी मिठाच्या कोमट पाण्यात 10 मिनिटे बुडवून स्वच्छ धुवा आणि मग ही पेस्ट लावा.

5. त्वचेवर डाग किंवा पुरळ असेल तर

हिंगाची पेस्ट करून फक्त डाग असलेल्या ठिकाणी लावावी. रोज लावल्याने डाग हलका होतो असे सांगितले जाते. जळजळ झाल्यास लगेच धुऊन टाका.

6. सायनसचा त्रास असेल तर

व्हिटॅमिन सी असलेली फळे जसे लिंबू, टोमॅटो, संत्री, मोसंबी, अननस आहारात वाढवा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सायनसच्या त्रासात आराम मिळण्यास मदत होते.

7. चप्पल एका बाजूने झिजली असेल तर सावध व्हा

अनेकांची चप्पल एका बाजूने जास्त झिजते. याचा अर्थ चालण्याची पद्धत चुकीची आहे. अशी चप्पल लगेच बदला नाहीतर गुडघेदुखी आणि टाचदुखी वाढू शकते.

8. रोज एकच चप्पल वापरू नका

रोज एकाच प्रकारची चप्पल वापरल्याने तळव्यावर एकाच ठिकाणी दाब येतो. प्लांटर फॅशिया नावाच्या स्नायूवर ताण येऊन सूज, टाचदुखी येऊ शकते. म्हणून 2 ते 3 जोड चप्पल आलटून पालटून वापरा.

9. पित्ताचा त्रास नसेल तर मेथी खा

ज्यांना पित्ताचा त्रास नाही त्यांनी रोज सकाळी 5 ते 6 मेथीचे दाणे चावून खावेत. यामुळे दात आणि घशाचे विकार कमी होतात.

10. तणाव आणि झोप न येण्यासाठी मेथीचा मसाज

10 मिनिटे तळहात आणि तळपायावर मूठभर मेथीचे दाणे घेऊन हलका दाब देत फिरवा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि एक्युप्रेशर प्रमाणे आराम मिळतो.

11. चक्कर आणि डोकेदुखीवर

अंगठ्याच्या वरच्या भागावर 2-3 मेथीचे दाणे ठेवून चिकटपट्टी लावा. हा एक्युप्रेशरचा प्रकार आहे, काही वेळात डोकेदुखी हलकी वाटते.

12. पित्त टाळण्यासाठी मध

ज्यांना डायबेटीस नाही त्यांनी रोज सकाळी एक चमचा मध कोमट पाण्यासोबत घ्यावा. पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

13. गॅस होऊ नये म्हणून

जेवणाच्या 10 मिनिटे आधी चिमूटभर ओवा, सैंधव मीठ, जिरे, धने आणि हिंग एकत्र करून चावून खा. गॅस आणि पोट फुगणे कमी होते.

14. पोट साफ होत नसेल तर

रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात चिमूटभर हळद आणि दोन चमचे साजूक तूप टाकून प्या. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

15. सांधेदुखीवर पुदिन्याचा उपाय

एक चमचा पुदिन्याचा रस आणि तिळाचे तेल एकत्र गरम करून दुखणाऱ्या सांध्यावर हलक्या हाताने मसाज करा.

16. त्वचा रोग आणि खाजेवर

व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल फोडून त्याचे तेल खाज येणाऱ्या ठिकाणी लावावे. त्वचा मऊ होते. खाण्यासाठी कॅप्सूल घ्यायची असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय घेऊ नका.

Disclaimer - वरील उपाय हे पारंपारिक घरगुती माहितीवर आधारित आहेत. कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.