तुरटी म्हणजेच फिटकरी, आपण सगळे दाढी केल्यानंतर कापले तर लावतो. पण तुम्हाला माहित आहे का, तुरटी ही अमृततुल्य आहे. आयुर्वेदात तुरटीला अनेक आजारांवर गुणकारी मानले जाते. पावसाळ्यात पाणी स्वच्छ करण्यासाठी तर तुरटीचा वापर होतोच, पण याचे आणखी ९ मोठे फायदे आहेत. तुरटी दोन रंगात मिळते, लाल आणि सफेद. जास्त करून सफेद तुरटीचा वापर केला जातो.
1. घामाची समस्या दूर होते - ज्यांना जास्त घाम येतो त्यांनी अंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटी टाकून अंघोळ करावी. घाम येणे कमी होते आणि अंगाची दुर्गंधी पण जाते.
2. जखमेतून रक्त येणे थांबते - कापले असेल किंवा जखम झाली असेल तर ती जखम तुरटीच्या पाण्याने धुवा आणि थोडी पावडर टाका. रक्त लगेच बंद होते.
3. दातदुखीवर गुणकारी - तुरटी आणि काळी मिरीची पावडर एकत्र करून दातांच्या मुळांना लावल्यास दातदुखी कमी होते.
4. चेहरा मुलायम होतो - सेव्हिंग केल्यानंतर चेहऱ्यावर तुरटी लावल्याने चेहरा मुलायम होतो आणि इन्फेक्शन होत नाही.
5. दमा आणि खोकल्यावर आराम - अर्धा ग्राम तुरटी पावडर मधात मिक्स करून चाटल्याने दमा आणि खोकल्यात आराम मिळतो.
6. तोंडाची दुर्गंधी जाते - रोज सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यात तुरटी टाकून गुळण्या केल्यास दातातील किडे मरतात आणि तोंडाचा वास जातो.
7. टॉन्सिलवर उपाय - टॉन्सिलचा त्रास असेल तर गरम पाण्यात चिमूटभर तुरटी आणि मीठ टाकून गुळण्या करा. लगेच आराम मिळेल.
8. केसातील उवा मरतात - एक लिटर पाण्यात 10 ग्रॅम तुरटी टाकून त्या पाण्याने केस धुतल्यास उवा मरतात.
9. दात मजबूत होतात - 10 ग्रॅम तुरटी आणि 5 ग्रॅम सैंधव मीठ एकत्र करून पावडर बनवा. रोज या पावडरने दात घासल्यास दातदुखी थांबते आणि दात मजबूत होतात.
हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.