HEALTH IS WEALTH : अर्धशिशी म्हणजे काय ? कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि आहार टिप्स - संपूर्ण माहिती - टॉप न्यूज मराठी

HEALTH IS WEALTH : अर्धशिशी म्हणजेच मायग्रेन ही डोकेदुखीचा एक प्रकार आहे ज्यात डोक्याच्या एका बाजूला प्रचंड ठणका बसतो. हा त्रास स्त्री-पुरुष कोणालाही होऊ शकतो, पण त्याची वारंवारता आणि तीव्रता प्रत्येक व्यक्तीत वेगळी असते. मेंदूला होणारा रक्तपुरवठा डाव्या आणि उजव्या बाजूला विभागलेला असतो. जेव्हा एका बाजूचा रक्तप्रवाह असंतुलित होतो तेव्हा मेंदूत CGRP नावाचे पेप्टाइड आणि सोडियमचे प्रमाण बिघडते. त्यामुळे डोक्याच्या रक्तवाहिन्या आकुंचन आणि प्रसरण पावतात आणि मज्जातंतूंमध्ये दाह होतो. यातूनच अर्धशिशीचा अ‍ॅटॅक येतो.

अर्धशिशीची प्रमुख कारणे आणि ट्रिगर

अर्धशिशी एकदम येत नाही. त्यामागे काही विशिष्ट कारणे असतात. उपाशी राहणे, अपुरी झोप, जागरण, प्रखर उन्हात किंवा प्रकाशात जास्त वेळ राहणे, मानसिक ताण, दगदग हे सर्वात मोठे ट्रिगर आहेत. काही लोकांना सूर्योदयापासून डोकेदुखी सुरू होऊन सूर्यास्तानंतरच थांबते. दारू, सिगारेट आणि जड मांसाहारामुळेही अ‍ॅटॅक येऊ शकतो.

लक्षणे ओळखा  

अ‍ॅटॅक येण्यापूर्वी डोके जड वाटणे, आवाज आणि प्रकाशाचा त्रास होणे अशी सुरुवातीची लक्षणे दिसतात. काहींना डोळ्यापुढे अंधारी येते याला retinal migraine म्हणतात. काही वेळा डोळ्यांच्या हालचाली मंद होतात ज्याला opthalmic migraine म्हणतात. गंभीर केसेसमध्ये हात, चेहरा बधीर होणे किंवा लकवा झाल्यासारखे वाटणे ही hemiplegic migraine ची लक्षणे आहेत. डोकेदुखी सोबत मळमळ, उलटी आणि चक्कर येणे देखील सामान्य आहे.

आहारात काय समाविष्ट करावे  

वेळेवर जेवण करणे अर्धशिशीसाठी खूप महत्त्वाचे आहे. मेंदूला ग्लुकोज मिळण्यासाठी आहारात थोडे गोड असावे. उन्हाळ्यात गोड ताक, कोकम सरबत आणि आवळा सरबत फायदेशीर ठरते. हिरव्या पालेभाज्या आणि गव्हामध्ये मुबलक मॅग्निशियम असते जे मायग्रेन कमी करण्यास मदत करते. मासे, साय नसले दूध आणि दुधापासून बनवले पदार्थ यात व्हिटॅमिन बी आणि रायबोफ्लेविन असते जे पेशींना ऊर्जा देते. गरमागरम कॉफी, बाजरी, आले आणि गूळ-तूप यांचा आहारात समावेश केल्याने फायदा होतो. थंडीत भूक जास्त लागते त्यामुळे न्याहारीला गोड जिलेबीसारखे पदार्थ घेतल्याने डोकेदुखी कमी होते.

घ्यावयाची दक्षता  

उन्हात जाताना छत्री किंवा टोपी वापरा. उपाशी राहू नका. मानसिक ताण आणि स्ट्रेस हार्मोन्स वाढणार नाहीत याची काळजी घ्या.

10 सोपे घरगुती उपाय

आल्याचा तुकडा लिंबासोबत चघळल्याने आराम मिळतो. अळशीची भाजलेली पूड मीठ घालून 2-3 महिने घेतल्याने त्रास कमी होतो. राईचे पोटीस कपाळावर लावावे. सुंठ, दालचिनी, वेलदोड्याचे तेल आणि जायफळाचा लेप लावल्याने ठणका कमी होतो. काळे मीठ आणि हळदीचा लेप, तुळशीचे चुर्ण मधासोबत, चिमूटभर हिंग काळ्या मिठासोबत घेणे उपयुक्त आहे. लिंबाचा तुकडा कपाळावर चोळणे आणि सैधव मीठ पाण्यात घालून पिणे देखील तात्काळ आराम देते. अर्धशिशी पूर्णपणे बरी होत नसली तरी योग्य आहार, जीवनशैली आणि वेळेवर केलेल्या उपायांनी तिची तीव्रता आणि वारंवारता नक्कीच कमी करता येते. त्रास जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.