HEALTH : दररोज लिंबू पाणी पिण्याचे 8 चमत्कारी फायदे, वजनापासून ते हृदयापर्यंत सर्व आजारांवर गुणकारी - टॉप न्यूज मराठी

लिंबू हे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असते. चवीसाठी वापरले जाणारे लिंबू हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. आयुर्वेदात लिंबूला खूप महत्व आहे. लिंबात व्हिटॅमिन सी चे प्रमाण खूप जास्त असते.

लिंबाचे आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून घेऊया.

1. रोगप्रतिकारक शक्ती वाढते

लिंबात व्हिटॅमिन सी भरपूर असते जे शरीरासाठी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. हे मुक्त रॅडिकल्सला नष्ट करते. व्हिटॅमिन सी मुळे हृदयविकार, पक्षाघात आणि कमी रक्तदाबाचा धोका कमी होतो. एका मध्यम आकाराच्या लिंबाच्या रसात सुमारे 31 mg व्हिटॅमिन सी असते, तर एका प्रौढ व्यक्तीला दररोज 65 ते 90 mg व्हिटॅमिन सी ची गरज असते.

2. वजन कमी होण्यास मदत

लिंबूमध्ये असलेले पॉलीफेनॉल अँटीऑक्सिडंट वजन कमी करण्यास मदत करतात. लिंबातील अँटिऑक्सिडंट्स रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करून इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात. हे दोन्ही घटक टाईप 2 मधुमेहाचे मुख्य कारण मानले जातात, त्यामुळे लिंबू पाणी फायदेशीर आहे.

3. त्वचा उजळते आणि तरुण राहते

लिंबातील व्हिटॅमिन सी त्वचेवरील सुरकुत्या कमी करते. ते त्वचेला वृद्धत्वापासून वाचवते आणि उन्हामुळे होणाऱ्या नुकसानापासून रक्षण करते. नियमित सेवनाने त्वचा चमकदार होते.

4. पचनक्रिया सुधारते

ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे. यामुळे पचनक्रिया मजबूत होते आणि पोट साफ राहते.

5. तोंडाची दुर्गंधी दूर होते

अनेकदा लसूण, कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला वास येतो. अशा वेळी लिंबू पाणी प्यायल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते. लिंबू लाळ ग्रंथींना सक्रिय करते ज्यामुळे तोंड फ्रेश राहते.

6. मुतखड्यावर गुणकारी

लिंबात सायट्रिक अॅसिड असते जे मुतखड्याचा धोका कमी करते. सायट्रिक अॅसिड मधील सायट्रेट नावाचे संयुग लहान लहान खडे फोडण्यास मदत करते.

7. अॅनिमिया पासून बचाव

शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो. लिंबात थोड्या प्रमाणात लोह असते आणि त्यातील व्हिटॅमिन सी लोह शोषून घेण्यास मदत करते, त्यामुळे अशक्तपणा कमी होतो.

8. हृदय निरोगी राहते

जर एक संपूर्ण लिंबू खाल्ले तर शरीराला सुमारे 52 टक्के दैनिक गरजेएवढे व्हिटॅमिन सी मिळते. लिंबू पाणी प्यायल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. यातील फायबर आणि प्लांट कंपाऊंड हृदयासाठी फायदेशीर असतात.

कसे प्यावे लिंबू पाणी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक लिंबू पिळून त्यात थोडे मध टाकून प्यावे. मात्र जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिऊ नये, यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते.

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.