आरोग्य : तुम्ही पण महिन्यातून 2-3 वेळा सर्दी, ताप, थकवा याने हैराण होता का. औषध घेतलं की 2 दिवस बरं वाटतं, परत तेच सुरू होतं. तर लक्षात ठेवा, हा आजार नाही, तुमच्या सवयींचा प्रॉब्लेम आहे. तुमची इम्युनिटी कमकुवत झाली आहे. खाली दिलेली 7 कारणं तपासा, त्यातलं एक जरी कारण असेल तरी तुम्ही सारखे आजारी पडणार.
1. तुमचा आहार योग्य आहे का
आपण काय खातो, किती खातो, कधी खातो याला खूप महत्त्व आहे. बाहेरचं तळलेलं, जास्त साखर, जास्त मीठ, रात्री उशिरा जेवण यामुळे पचन बिघडतं आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. रोजच्या जेवणात डाळ, पालेभाज्या, फळं, दही असायलाच हवं. जेवण वेळेवर घ्या.
2. व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे का
सतत थकवा, हाडं दुखणे, सर्दी होणे हे व्हिटॅमिन डी कमी झाल्याची लक्षणं आहेत. आपण दिवसभर घरात, ऑफिसमध्ये असतो, उन्हात जातच नाही. रोज सकाळी 15 ते 20 मिनिटं कोवळ्या उन्हात बसा. गरज वाटली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी तपासून घ्या.
3. तुम्ही पुरेसे पाणी पिताय ना
आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असते. पाणी कमी प्यायलं तर शरीरातले विषारी घटक बाहेर पडत नाहीत. दिवसाला 8 ते 10 ग्लास पाणी प्या. चहा, कॉफी पाणी नाही, साधं पाणी प्या.
4. तुम्हाला पुरेशी झोप मिळते का
आपण झोपलो की शरीर रोग, सूज, जखम यांच्याविरुद्ध लढण्यासाठी काही प्रथिने सोडते. रोज 7 ते 8 तास झोप गरजेची आहे. मोबाईल पाहत उशिरा झोपणं ही सवय इम्युनिटीला सगळ्यात जास्त मारते.
5. तोंडाची स्वच्छता करता ना
तोंड हा बॅक्टेरिया शरीरात जाण्याचा मुख्य मार्ग आहे. दिवसातून दोनदा ब्रश करा, जीभ साफ करा. दातात अडकलेलं अन्न, हिरड्यांचा आजार यामुळेही वारंवार ताप, घसा दुखणे होऊ शकते.
6. कुटुंबात कुणी सारखं आजारी पडतं का
काही वेळा रक्तातल्या पांढऱ्या पेशी कमी असतात. त्या पेशीच रोगांशी लढतात. त्या कमी असतील तर माणूस सारखा आजारी पडतो. कुटुंबात असा इतिहास असेल तर एकदा CBC ब्लड टेस्ट करून घ्या.
7. तुम्हाला ताण आहे का
धावपळीच्या जीवनात ताण नसलेला माणूस सापडणं कठीण आहे. पण सततचा ताण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती संपवतो. ताणामुळे झोप लागत नाही, भूक लागत नाही, पोट बिघडतं. रोज 10 मिनिटं चालणं, प्राणायाम, आवडतं गाणं ऐकणं याने ताण कमी होतो.