आरोग्य : आजकाल 30 ते 40 वयातही हार्ट अटॅक येत आहे. हार्ट अटॅक अचानक येतो असे आपल्याला वाटते पण डॉक्टर सांगतात की हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना आधीपासूनच आपले शरीर इशारे देत असते. पण आपण त्या इशाऱ्यांकडे अॅसिडिटी, थकवा किंवा सर्दी समजून दुर्लक्ष करतो. हेच दुर्लक्ष जीवावर बेते. कोणते आहेत ते 5 संकेत सविस्तर पाहू.
1. छातीत दुखणे किंवा दाब आल्यासारखे वाटणे -
हार्ट अटॅकचा सगळ्यात पहिला आणि मुख्य संकेत म्हणजे छातीत दुखणे. हे दुखणे सतत नसते. काही मिनिटांसाठी येते आणि जाते. अनेकांना छातीच्या मध्यभागी दाब आल्यासारखे, काहीतरी जड वस्तू ठेवल्यासारखे वाटते. काही वेळा हे दुखणे डाव्या हाताकडे, खांद्याकडे किंवा जबड्याकडे जाते. जर तुम्हाला चालताना, जिना चढताना किंवा जोरात काम करताना असा त्रास होत असेल आणि थांबल्यावर बरे वाटत असेल तर हे हार्टचे लक्षण असू शकते. याला अॅसिडिटी समजून चुकू नका.
2. कारण नसताना खूप जास्त थकवा येणे -
जर तुम्ही रोजची कामे केली तरी खूप जास्त थकवा येत असेल, झोप पूर्ण होऊनही दिवसभर थकल्यासारखे वाटत असेल तर हे हार्ट कमकुवत होण्याचे लक्षण आहे. हार्टला रक्त पंप करण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो तेव्हा शरीरातील रक्तपुरवठा कमी होतो आणि थकवा येतो. विशेषतः महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या एक महिना आधी असा असामान्य थकवा दिसतो. जर 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ असा थकवा असेल तर लगेच डॉक्टरांना भेटा.
3. श्वास घेण्यास त्रास होणे आणि घाम येणे -
थोडे चालल्यावर धाप लागणे, श्वास फुलणे हे फुफ्फुसाचे नाही तर हार्टचे लक्षण असू शकते. हार्ट व्यवस्थित रक्त पंप करू शकले नाही तर फुफ्फुसात पाणी साचते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. रात्री झोपताना उशी जास्त घेऊन झोपावे लागणे किंवा झोपेतून श्वास घ्यायला त्रास होऊन जाग येणे हे धोक्याचे लक्षण आहे. त्याचबरोबर काहीही कष्ट न करता अचानक थंड घाम येणे, हे देखील हार्ट अटॅकच्या आधीचा संकेत आहे.
4. हात, मान, पाठ आणि पोटात दुखणे -
हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीत दुखणे असे नाही. शरीराच्या इतर भागातही वेदना होतात. डाव्या हातात मुंग्या येणे किंवा दुखणे, मानेत, पाठीत किंवा पोटाच्या वरच्या भागात दुखणे हे देखील हार्टच्या नस ब्लॉक होण्याचे लक्षण आहे. अनेक वेळा पोटात गॅस आहे असे वाटून लोक गॅसची गोळी घेतात पण तो गॅस नसून हार्टचा त्रास असतो. जर वेदना फिरत असेल किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर दुर्लक्ष करू नका.
5. अनियमित हृदयाचे ठोके आणि चक्कर येणे -
कधी कधी हृदयाचे ठोके खूप जोरात वाटणे, धडधड होणे किंवा एक ठोका चुकल्यासारखे वाटणे. याला डॉक्टर पॅल्पिटेशन म्हणतात. हे एक महिन्यापासून अधून मधून होत असेल तर हार्टची इलेक्ट्रिक सिस्टीम बिघडत आहे असे समजावे. त्याचबरोबर अचानक चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे हे मेंदूला रक्त कमी पडत असल्याचे लक्षण आहे. हे दोन्ही संकेत एकत्र येत असतील तर ताबडतोब ईसीजी काढणे गरजेचे आहे.
कोणत्या लोकांनी जास्त काळजी घ्यावी -
ज्यांचे वय 35 पेक्षा जास्त आहे, ज्यांना बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल आहे, जे रोज सिगारेट किंवा तंबाखू घेतात, ज्यांचे वजन जास्त आहे आणि घरात कोणाला हार्टचा आजार आहे अशा लोकांनी हे संकेत अजिबात दुर्लक्ष करू नयेत.
काय करावे -
जर वर दिलेल्या 5 पैकी 2 ते 3 संकेत तुम्हाला गेल्या काही आठवड्यांपासून दिसत असतील तर लगेच डॉक्टरकडे जा. ईसीजी, 2डी इको आणि टीएमटी या तीन टेस्ट करून घ्या. या टेस्टमध्ये हार्ट ब्लॉकेज आहे का ते लगेच कळते. वेळेत उपचार घेतले तर मोठा हार्ट अटॅक टाळता येतो. रोज 30 मिनिटे चालणे, तेलकट तळकट कमी खाणे, मीठ कमी करणे आणि रात्री 7 तास झोप घेणे हे हार्टसाठी सगळ्यात चांगले उपाय आहेत.
डिस्क्लेमर - हा लेख माहितीसाठी आहे. कोणतेही लक्षण दिसल्यास स्वतः औषध घेऊ नका, जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.