आपल्या सर्वांनाच स्वतःला तंदुरुस्त आणि स्लिम दिसायचे आहे. पण यासाठी व्यायाम आणि शारीरिक हालचालींबरोबरच आहारावरही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पण ते सगळ्यांच्याच नियंत्रणात नाही. कारण खाण्यावर कंट्रोल करणे फार कमी लोकांना जमते. हाच विचार करून अनेक लोक व्यायाम सुरु करण्याआधीच हा विचार डोक्यातून काढून टाकतात आणि व्यायाम सुरु करत नाहीत.
तुम्हालाही व्यायाम करायचा असेल पण सुरुवात कशी करावी हे कळत नसेल किंवा मध्येच ब्रेक पडला असेल आणि पुन्हा सुरु करायचा असेल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा, ज्यामुळे तुम्ही व्यायाम सुरू कराल आणि पुन्हा कधीही सोडणार नाही.
व्यायामाची सुरुवात कशी करावी?
1. कारण पक्के करा
सर्वात आधी स्वतःला हे पटवून द्या की तुम्हाला व्यायाम का करायचा आहे. वजन कमी करण्यासाठी, फिट राहण्यासाठी की आजार दूर ठेवण्यासाठी, कारण स्पष्ट असेल तरच सातत्य टिकते.
2. गोल आणि डेडलाईन फिक्स करा
एकदा व्यायाम करायचे ठरवले की तुमचा गोल फिक्स करा. जसे की तुम्हाला किती किलो वजन कमी करायचे आहे. मग एक डेडलाईन फिक्स करा की इतक्या दिवसांत मला इतके वजन कमी करायचे आहे. गोल लहान ठेवा म्हणजे तो पूर्ण झाल्यावर मोटिवेशन वाढते.
3. रोजची सक्ती करू नका
दररोज एकाच वेळी व्यायाम करण्याचा निर्णय घेऊ नका. कारण सुरुवातीला काही दिवस चांगले वाटते, त्यानंतर ते त्रासदायक वाटू शकते. त्यामुळे सुरुवातीला आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरू करा. प्रत्येक पर्यायी दिवशी व्यायाम करा.
4. सोप्या व्यायामाने सुरुवात करा
सुरुवातीलाच जास्त आणि हेवी व्यायाम करू नका. त्यापेक्षा सर्वात सोप्या व्यायामांपासून सुरुवात करा. चालणे, स्ट्रेचिंग, हलके जॉगिंग यापासून सुरुवात केल्यास शेवटपर्यंत उत्साह टिकून राहील.
व्यायाम कंटाळवाणा वाटतोय?
जेव्हा जेव्हा तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येऊ लागतो तेव्हा स्वतःला तुमच्या ध्येयाची आठवण करून द्या. स्वतःला आव्हान द्या. हे तुम्हाला सातत्य राखण्यास मदत करेल.
व्यायाम करताना कंटाळा येणे हे बहुतेक लोकांसोबत घडते. पण त्यासाठी तुमच्या मनातील भूक जागृत करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तंदुरुस्त होण्यास सुरुवात कराल, जेव्हा तुमचे शरीर आकारात येऊ लागेल, तेव्हा तुमची फिटनेसची भूकही वाढू लागेल.
फक्त व्यायामच नाही तर आहाराकडेही लक्ष द्या. तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुमच्या जीवनशैलीनुसार हेल्दी डाएट चार्ट फॉलो करा. तुम्ही त्यात एक चीट डे देखील ठेवू शकता जेणेकरून एक दिवस तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ खायला मिळतील.