आरोग्य : तुमच्यासोबत कधी असे झाले आहे का की रोज रात्री 2 ते 3 च्या दरम्यान अचानक जाग येते आणि झोप लागत नाही? अनेक लोक याला भुताटकी किंवा आत्म्याचा संकेत समजतात. पण विज्ञान यामागचे कारण काही वेगळेच सांगते.
1. लिव्हर आणि शरीराची सफाई प्रक्रिया
आयुर्वेद आणि चायनीज घड्याळानुसार रात्री 1 ते 3 हा वेळ आपल्या लिव्हरचा असतो. या वेळेत लिव्हर शरीरातील घाण म्हणजेच टॉक्सिन बाहेर काढत असते. जर तुमचे लिव्हर खराब असेल, तुम्ही जास्त तेलकट खात असाल किंवा दारू पित असाल तर या वेळेत तुम्हाला अचानक जाग येते. हे शरीर तुम्हाला सांगत असते की लिव्हरवर जास्त कामाचा ताण आहे.
2. जास्त स्ट्रेस आणि कॉर्टिसोल हार्मोन
दिवसभराचा टेन्शन, ऑफिसचे काम यामुळे आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचे हार्मोन वाढते. रात्री 2 वाजता या हार्मोनची पातळी सर्वात जास्त असते. त्यामुळे जर तुम्ही खूप विचार करत असाल तर मेंदू तुम्हाला झोपू देत नाही आणि अचानक जाग येते.
३. झोपण्यापूर्वी मोबाईल पाहणे
अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल पाहतात. मोबाईलच्या निळ्या प्रकाशामुळे आपल्या डोळ्यातील मेलाटोनिन नावाचे झोपेचे हार्मोन कमी होते. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि 2 वाजता जाग येते.
4. रक्तातील साखर कमी होणे
रात्री उशिरा जेवण किंवा साखर जास्त खाल्ल्याने रात्री 2 वाजता रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होते. यामुळे घाम येणे, धडधडणे आणि जाग येणे असे प्रकार होतात.
5. आध्यात्मिक कारण - ब्रह्म मुहूर्ताची चाहूल
धार्मिक ग्रंथात रात्री 3 ते 5 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. या वेळेत विश्वातील ऊर्जा सर्वात जास्त असते. त्यामुळे अनेकांना या वेळेत जाग येते. पण जर रोजच येत असेल तर ते आध्यात्मिक नसून शारीरिक कारण आहे.
रात्री 8 नंतर चहा कॉफी पिऊ नका. झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल बंद करा. रोज रात्री कोमट पाण्याने पाय धुवा. झोपण्यापूर्वी दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करा. आणि जर 15 दिवसांपेक्षा जास्त हा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.