चहा सगळ्यांनाच आवडतो. क्वचितच असे कोणी असते जे चहा घेत नाही. खासकरून थंडीच्या दिवसात लोक चहाचे जास्त सेवन करतात. चहाशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही. असे म्हणतात की थंडीच्या दिवसात एक कप चहाने तुमच्या अनेक समस्या दूर होतात. चहाला थंडीच्या दिवसात बेस्ट इम्यूनिटी बूस्टर मानले जाते. पण जर तुम्हाला सांगितले की थंडीच्या दिवसात जास्त चहा पिणे टाळले पाहिजे तर तुम्ही असे कराल का?
इन्स्टाग्राम अकाऊंटवर सीनियर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपेटोलॉजिस्ट व ओबेसिटी स्पेशालिस्ट डॉक्टर निवेदिता पांडे यांनी हिवाळ्यात चहाचे जास्त सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की हिवाळ्यात चहाचे सेवन खूप जास्त होते. भलेही याचे काही फायदे होत असतील पण याचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. चला जाणून घेऊ हिवाळ्यात चहाचे सेवन कमी का करावे.
चहा जास्त वेळ उकळू नका
थंडीच्या दिवसात आल्याचा चहा मिळाला तर मन शांत होते. हा चहा घेतल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच हिवाळ्यात पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याची समस्याही दूर होते. पण डॉक्टर पांडे यांनी आल्याचा चहा जास्त उकळून न पिण्याचा सल्ला दिला आहे. त्या सांगतात की आपण चहामध्ये आले, लवंग, वेलची टाकून बराच वेळ उकळतो. प्रयत्न करा की चहा जास्त वेळ उकळू नका. कारण यामुळे चहामधील टॅनिन बाहेर येते. जे ऍसिडिटीचे मोठे कारण बनते.
काय असते टॅनिन?
टॅनिन एक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट आहे. जे चहा पावडरमध्ये आढळते. जेव्हा टॅनिन जास्त प्रमाणात घेतले जाते तेव्हा ऍसिड रिफ्लक्स आणि गॅस तयार होतो. जर चहा घेतल्यावर गॅस जास्त वेळ बनत असेल तर पोटात सूज येऊ शकते. त्यामुळे ज्यांना आतड्यासंबंधी समस्या आहे त्यांनी चहाचे सेवन कमी करावे. इतकेच नाही तर जर पोटात इन्फेक्शन असेल तर चहाचे सेवन पूर्णपणे बंद करावे.
दिवसातून किती चहा प्यावा?
एक्सपर्टनुसार दिवसातून दोन किंवा तीनपेक्षा जास्त वेळा चहा घेऊ नये. हिवाळ्यात चहाचे सेवन दोन ते तीन वेळा करणेच चांगले ठरू शकते. यात तुम्ही हवे ते मिक्स करून पिऊ शकता. यापेक्षा जास्त वेळा चहा पिणे नुकसानकारक ठरू शकते. दोन चहा मधील अंतर किमान चार ते पाच तास ठेवा. रिकाम्या पोटी कडक चहा पिणे पूर्णपणे टाळा. त्यामुळे अल्सरचा धोका वाढतो.