आरोग्य : आक्टोबर महिना सुरु झाला की परतीचा पाऊस संपून पुन्हा एकदा कडक ऊन सुरु होते. यालाच आक्टोबर हिट म्हणतात. या काळात घाम, थकवा, डोकेदुखी, पोटाचे विकार आणि झोप न लागणे असे त्रास खूप वाढतात. या उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण कोल्ड्रिंक्स पितो पण ते शरीरासाठी घातक आहेत. आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहे की या दिवसात ताज्या ताकाची तुलना थेट अमृताशी केली आहे.
ताक म्हणजे नक्की काय? दही घुसळून लोणी काढल्यानंतर जे पाणी उरते त्याला ताक म्हणतात. हे दिसायला साधे असले तरी यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.
ताकात विटामिन B-12, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखी महत्वाची तत्वे असतात. जी शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढतात आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. आयुर्वेदात सांगितले आहे की ताक प्यायल्यानंतर शरीराची झालेली झीज 90 टक्के भरून निघते आणि शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन शांत झोप लागते.
ज्यांचे पोट साफ होत नाही, पोटातून गुडगुड आवाज येतो त्यांच्यासाठी ताक हे रामबाण उपाय आहे. साधारण माणसाने रोज ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकद प्रचंड प्रमाणात वाढते.
1. लठ्ठपणा कमी होतो. रोज दुपारी जेवणानंतर ताक प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यात फॅट खूप कमी असते त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
2. वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर. अनेकांना सारखी लघवीला जावे लागते. अशा लोकांनी ताकात थोडे काळे मीठ टाकून प्यावे. याने हा त्रास कमी होतो.
3. तोंड येणे. तोंड आले असेल तर दह्याचे पाणी किंवा ताकाने गुळण्या कराव्यात. दोन दिवसात तोंड येणे बरे होते.
4. पोटातील जंतू मारण्यासाठी. लहान मुले असो किंवा मोठी माणसे, पोटात जंत झाले असतील तर ताकात थोडा ओवा टाकून प्यावे. याने पोटातील जंतू मरून जातात.
5. लघवीची जळजळ थांबवण्यासाठी. आक्टोबर हिट मध्ये अनेकांना लघवी करताना जळजळ होते. अशा वेळी ताकात थोडा गूळ टाकून प्यायल्यास ही जळजळ त्वरित बंद होते.
6. डोकेदुखी साठी. ऊन लागून डोके दुखत असेल तर थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यावी. याने डोकेदुखी लगेच कमी होते.
7. पोटदुखी साठी. सकाळी रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते आणि पचनक्रिया सुधारते.
8. पित्ताचा त्रास कमी होतो. ज्यांना सतत छातीत जळजळ किंवा पित्ताचा त्रास होतो त्यांनी ताकात थोडी साखर आणि काळी मिरी पूड टाकून प्यावे.
9. लहान मुलांसाठी. लहान मुलांना दात येत असताना खूप त्रास होतो. अशा वेळी दिवसातून 2 ते 3 वेळा 4 चमचे ताक दिल्यास दात येताना होणारा त्रास आणि ताप कमी होतो.
10. पंचकर्म आपोआप होते. आयुर्वेदात सांगितले आहे की तीन दिवस इतर काहीही न खाता फक्त ताक पीत राहिल्यास शरीराचे पंचकर्म आपोआप होते. शरीरातील सर्व घाण बाहेर निघून जाते.
आयुर्वेदानुसार ताक नेहमी दुपारी प्यावे. रात्री ताक पिऊ नये. ताक नेहमी ताजे असावे. फ्रिजमधील आंबट ताक पिऊ नये. ताकात कधीही कोल्ड्रिंक मिसळू नये. चांगल्या परिणामासाठी ताकात जिरेपूड, कोथिंबीर आणि काळे मीठ टाकून प्यावे.
सहा महिन्यातून एकदा हा प्रयोग करून पहा. तीन दिवस फक्त ताकावर राहिल्यास तुमचे भविष्यात होणारे मोठे आजार टळू शकतात आणि औषधांचा खर्च वाचू शकतो.
म्हणूनच आजपासून कोल्ड्रिंक्स बंद करा आणि अमृतासमान असलेल्या ताकाला आपल्या आहारात स्थान द्या.
हा लेख सामान्य माहिती आणि आयुर्वेदिक संदर्भावर आधारित आहे. कोणत्याही आजारासाठी किंवा नवीन आहार सुरु करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.