HEALTH : डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ? दृष्टी वाढवण्यासाठी करा हे घरगुती उपाय, चष्म्यापासून राहाल दूर - टॉप न्यूज मराठी

आरोग्य : सध्याच्या धावपळीच्या जीवनात लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसभर स्क्रीनसमोर बसल्याने सर्वात जास्त परिणाम होतो तो आपल्या डोळ्यांवर. एकदा नजर कमजोर झाली की चष्मा आणि डॉक्टरांच्या फेऱ्या सुरू होतात. पण चष्मा लागण्याआधीच जर थोडी काळजी घेतली तर डोळ्यांची दृष्टी नैसर्गिकरित्या चांगली ठेवता येते.

डॉ. नरेंद्र वानखडे यांनी सांगितलेले डोळ्यांसाठीचे 6 प्रभावी घरगुती उपाय जाणून घेऊया.

1. गुलाबजल - डोळ्यांसाठी नैसर्गिक थंडावा

गुलाबजल हे फक्त सौंदर्यासाठी नाही तर डोळ्यांसाठीही खूप गुणकारी आहे. गुलाबजल थंड असल्याने डोळ्यांचा थकवा दूर होतो. आठवड्यातून 2 ते 3 वेळा डोळ्यात गुलाबजलाचे 2 ते 3 थेंब टाकल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते. तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठीही कापसावर गुलाबजल घेऊन डोळ्यांवर ठेवल्यास फायदा होतो.

2. मोहरीच्या तेलाने पायाला मालिश

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण पायाच्या तळव्याचा आणि डोळ्यांचा थेट संबंध आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटे मोहरीच्या तेलाने पायाच्या तळव्याला मालिश केल्याने डोळ्यांची नस सक्रिय होते आणि दृष्टी सुधारते. हा आयुर्वेदिक उपाय जुना आणि खूप प्रभावी आहे.

3. वजन नियंत्रण आणि नियमित व्यायाम

वजन वाढले की मधुमेह म्हणजेच डायबिटीज-2 चा धोका वाढतो आणि त्याचा थेट परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवर होतो. ज्या लोकांचे वजन नियंत्रित असते आणि जे नियमित व्यायाम करतात त्यांची दृष्टी जास्त काळ चांगली राहते. म्हणून रोज 30 मिनिटे चालणे, योगा करणे गरजेचे आहे.

4. बदाम आणि दूध

बदामामध्ये व्हिटॅमिन-E आणि व्हिटॅमिन-A भरपूर प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी आवश्यक आहे. दररोज रात्री दुधात बदामाची पूड टाकून प्यायल्याने स्मरणशक्ती तर वाढतेच पण डोळ्यांची दृष्टीही बळकट होते.

5. आवळ्याचे सेवन

आवळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट डोळ्यांचा पडदा निरोगी ठेवते. पडदा निरोगी असेल तरच दृष्टी स्वच्छ राहते. तुम्ही आवळा ज्यूस, आवळा सुपारी किंवा कच्चा आवळा रोज खाऊ शकता.

6. योग्य आहार घ्या

डोळ्यांसाठी आहार खूप महत्वाचा आहे. गाजर, पालक, ब्रोकोली, अक्रोड यामध्ये व्हिटॅमिन-A आणि ओमेगा-3 असते. या भाज्या आणि फळांचा रोजच्या जेवणात समावेश करा.

हे सर्व उपाय घरगुती आहेत. जर तुम्हाला डोळ्यात सतत जळजळ, पाणी येणे किंवा अंधुक दिसणे असा त्रास असेल तर ताबडतोब नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःहून कोणतेही औषध डोळ्यात टाकू नका.